PF च्या नियमांत होणार मोठा बदल, तुम्हाला होणार फायदा

PF च्या नियमांत होणार मोठा बदल, तुम्हाला होणार फायदा

PF मध्ये कमी योगदानाचा नियम सगळ्यांसाठी लागू नसेल. काही श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांनाच याची परवानगी दिली जाईल. कर्मचाऱ्यांच्या श्रेणी ठरवताना काही निकषांच्या आधारे ते ठरवलं जाईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जानेवारी : प्रॉव्हिडंट फंड (Provident Fund)चा तुमच्या पगारात मोठा भाग असतो. इन हँड सॅलरी म्हणजे हातात येणारा पगार जास्त यावा म्हणून काही जण त्यांचा PF कमी कापावा, अशी इच्छा असते. यावर उपाय म्हणून EPFO एक मोठा निर्णय घेणार आहे. यानुसार अनेक जण PF कॉन्ट्रिब्युशन कमी करू शकतील. वर्किंग वुमेन, दिव्यांग कर्मचारी त्याचबरोबर 25 ते 35 वर्षं वयोगटातल्या लोकांना त्यांचं योगदान 2 ते 3 टक्क्यांनी कमी करण्याची परवानगी मिळू शकते.

कर्मचाऱ्यांच्या श्रेणी

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, PF मध्ये कमी योगदानाचा नियम सगळ्यांसाठी लागू नसेल. काही श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांनाच याची परवानगी दिली जाईल. कर्मचाऱ्यांच्या श्रेणी ठरवताना काही निकषांच्या आधारे ते ठरवलं जाईल. ज्या निकषांवर विचार होतोय त्यामध्ये एका श्रेणीत महिला कर्मचारी आणि दिव्यांगांचा समावेश होऊ शकतो. मनुष्यबळ विकास मंत्रालय अशा श्रेणी ठरवण्याबद्दल निर्णय घेतं आहे. याबद्दल लवकरच निर्णय होऊ शकतो.

(हेही वाचा : आजच केलंत हे काम तर रिटायरमेंटनंतर दर महिन्याला मिळणार 25 हजार रुपये)

आर्थिक सुरक्षा

कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी आर्थिक सुरक्षा हवी असते. त्याचवेळी तरुण कर्मचाऱ्यांना लग्न, घर खरेदी आणि करिअरच्या सुरुवातीच्या वर्षांत काही गरजा पूर्ण करण्यासाठी जास्त पैशांची आवश्यकता असते. हे सगळं लक्षात घेऊनच हा प्रस्ताव तयार करण्यात येतोय.

तुम्ही PF चे पैसे कधी काढू शकता ?

प्रॉव्हिडंट फंडबदद्ल सरकारने काही बदल केले आहेत. तुम्हाला PF मधून पैसे काढायचे असतील तर ऑनलाइन क्लेम करावा लागेल.

1. लग्नकार्य : लग्नासाठी तुम्ही PF अकाउंटमधून पैसे काढू शकता. तुम्हाला जर मुलं, भाऊ, बहीण यांच्या लग्नासाठी PF ची रक्कम काढायची असेल तर 50 टक्के रक्कम काढू शकता.

2. शिक्षण : पत्नी किंवा मुलांच्या उच्चशिक्षणासाठीही PF अकाउंटमधून 50 टक्के रक्कम काढी शकता. यासाठी तुमच्या नोकरीत 7 वर्षं पूर्ण होणं आवश्यक आहे.

3. घर आणि जमीन खरेदी : तुम्हाला जर घर किंवा जमिनीची खरेदी करायची असेल आणि नोकरीची 5 वर्षं पूर्ण झाली असतील तर PF खात्यातून रक्कम काढण्यासाठी अर्ज करू शकता.

4. मेडिकल इमर्जन्सी : तुम्ही तुमच्यावर किंवा पत्नी, मुलं आणि आईबाबांच्या उपचारांसाठीही PF मधून पैसे काढू शकता. यासाठी आवश्यक ती कागदपत्रं सादर करावी लागतील.

5. नोकरी गेली तर : EPFO ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महिन्यापेक्षा जास्त काळ नोकरीविना असलेल्यांसाठी PF च्या 75 टक्के रक्कम काढण्याची परवानही दिली होती. PF मध्ये जमा असलेली बाकीची 25 टक्के रक्कम नोकरी गेल्यानंतर 2 महिन्यांनंतर काढता येऊ शकते.

==============================================================

First published: January 22, 2020, 4:17 PM IST
Tags: Epfomoney

ताज्या बातम्या