जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सोन्याची झळाळी उतरली, मंगळवारचे भाव इथे पाहा

सोन्याची झळाळी उतरली, मंगळवारचे भाव इथे पाहा

सोन्याची झळाळी उतरली, मंगळवारचे भाव इथे पाहा

शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात (Gold prices today) घसरण झालेली पाहायला मिळाली. चांदीच्या दरातही (Silver Price today) मोठी घसरण झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात (Gold prices today) घसरण झालेली पाहायला मिळाली. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या भावात प्रति तोळा 112 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याबरोबरच चांदीचे भावही (Silver prices today)उतरले आहेत. प्रति किलो चांदीची किंमत 108 रुपयांनी कमी झाली आहे. मागणी कमी झाल्यामुळे सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याची माहिती एचडीएफसी सिक्युरीटीकडून देण्यात आली आहे. सोन्याचे आजचे भाव मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोनं प्रति तोळा 112 रुपयांनी कमी झालं. त्यामुळे सोन्याचे दर प्रति तोळा 41 हजार 381 रुपयांवरुन कमी होऊन 41 हजार 269 रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1 हजार 568 डॉलर प्रतिऔंस तर चांदी 17.72 डॉलर प्रतिऔंस झाली. चांदीचे आजचे भाव औद्योगिक मागणी कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम चांदीच्या किंमतीवर झाला आहे. चांदीचे दर प्रति किलो 108 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे चांदीची किंमत प्रति किलो 47 हजार 260 रुपयांवरुन 47 हजार 152 रुपयांपर्यंत उतरले आहेत. सोन्याचांदीच्या दरात घसरण कशामुळे**?** एचडीएफसी सिक्युरीटीचे सीनिअर अनालिस्ट (कमोडिटी) तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार सोने-चांदीच्या दरात मागणी कमी झाल्यामुळे घसरण झाली आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचे भावही घसरल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मुल्य स्थिरावलं आहे. त्याचा परिणाम सराफा बाजारातील सोन्याच्या किंमतीवर झाला. आज रुपयाचं मुल्य डॉलरच्या तुलनेत 71.23 इतकं होतं. अन्य बातम्या PNB च्या नावात खरंच बदल झालाय का? बँकेकडून सोशल मीडियावर स्पष्टीकरण टाटा-अदानी ट्रेन चालवण्याच्या रेसमध्ये! 100 मार्गांवर धावणार खासगी ट्रेन सिगारेट ओढण्याची सवय खिशाला आणखी देणार ताण, सिगारेटच्या किंंमतीत वाढ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात