नवी मुंबई, 11 फेब्रुवारी : CNBC TV18ला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार ITCने सर्व प्रकारच्या सिगारेटच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 ते 12 टक्क्यांनी सिगारेटच्या किंमती वाढू शकतात. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात (Budget 2020) तंबाखू आणि सिगारेटवरील उत्पादन शुल्क (Excise Duty) वाढवण्यात आलं आहे. त्याचाच परिणार सिगारेटच्या किंमतीवर होणार आहे. अर्थसंकल्प जाहीर करण्यात आल्यानंतर ITC ने आपल्या अनेक उत्पादनांच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यापैकी सिगारेटच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. सिगारेट ओढण्याची सवय पडणार महागात ITC ब्रँड वापरणाऱ्यांना सिगारेट महागात पडणार आहे. ITC ब्रँडची KSFT हे 10 सिगारेट्सचं पॅकेट आता 300 रुपयांऐवजी 320 रुपयांना मिळणार आहे. गोल्ड फ्लेकचे दर 50 रुपयांवरु वाढून 60 रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र कंपनीकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही आहे. बजेटमध्ये महत्त्वाचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 5 जुलै 2019 रोजी आपल्या पहिल्या बजेटमध्ये सिगारेटवर प्रति हजारांवर 5 रुपयांपासून प्रति हजारांवर 10 रुपये उत्पादन शूल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता. याआधी सिगारेटवर उत्पादन शुल्क आकारण्यात येत नव्हतं. (हेही वाचा - शेअर बाजारात गुंतवणूक ठरणार फायद्याची, आज सेन्सेक्सची 400 अंकांनी मुसंडी) सिगारेट उत्पादनामध्ये होणारी बनावट रोखण्यासाठी हे शुल्क वाढवण्यात आलं होतं. 70 मिमी लांबीच्या फिल्टर असणाऱ्या सिगारेटचे भाव प्रति हजार 5 रुपयांनी वाढवण्यात आले होते. फिल्टर असणाऱ्या 60 मिमी लांबीच्या सिगारेटचे भावही प्रति हजार 5 रुपयांनी वाढवण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.