नवी दिल्ली, 08 जुलै : बुधवारी 08 जुलै 2020 रोजी देखील सकाळच्या सत्रामध्ये सोन्याच्या किंमती वाढल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी बाजार बंद होत असताना सराफा बाजारात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमती प्रति तोळा 48,444 रुपये इतक्या होत्या. दरम्यान यामध्ये आज प्रति तोळा 510 रुपयांची वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार या (ibjarates.com) सोन्याच्या किंमती आहेत. काय आहेत 08 जुलै 2020 रोजी सोन्याचे भाव? या 24 कॅरेट सोन्याचे भाव आज 48,954 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे इतर शुद्धतेच्या सोन्यामध्ये देखील किंमती वाढल्या आहेत. 23 कॅरेट सोन्याचे भाव सकाळी 508 रुपये प्रति तोळाने वाढून 48,758 रुपयांवर पोहोचले आहेत. मंगळवारी बाजार बंद होताना हे दर 48,250 रुपये प्रति तोळा होते. (हे वाचा- आनंदाची बातमी! कोरोनाच्या संकटात ‘या’ बँकेच्या कर्मचाऱ्यांची होणार पगारवाढ ) त्याचप्रमाणे 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव अनुक्रमे 467 आणि 383 रुपये प्रति तोळाने वाढले आहेत. या वाढीनंतर 24 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे 44,842 रुपये प्रति तोळा आणि 36,716 रुपये प्रति तोळा झाले आहेत.
काय आहेत 08 जुलै 2020 रोजी चांदीचे भाव? मंगळवारी चांदीचे भाव 48,870 रुपये प्रति किलो होते. यामध्ये प्रति किलो 911 रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी चांदीचे आजचे सकाळच्या सत्रातील दर 49,781 रुपये प्रति किलो झाले आहे. बाजार बंद होताना सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये बदल झालेला पाहायला मिळतो. मोदी सरकारकडून खरेदी करा स्वस्त सोने मोदी सरकारकडून (Modi Government) स्वस्त सोनं खरेदी करण्याची आणखी एक संधी पुन्हा एकदा तुम्हाला मिळत आहे. हे सोने खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिलेल्या माहितीनुसार सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) खरेदीसाठीचा चौथा टप्पा 6 जुलै 2020 पासून सुरू झाला आहे. ही संधी 10 जुलैपर्यंत असणार आहे.यावेळी जारी करण्यात आलेल्या सोन्याच्या बाँडची किंमत (SGB Issue Price) 4,852 रुपये प्रति ग्रॅम आहे. (हे वाचा- SBI च्या ग्राहकांना दिलासा! आता कमी होणार तुमच्या कर्जावरील EMI ) तसंच सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. ऑनलाइन गुंतवणूकदारांसाठी इश्यू प्राइस 4,802 रुपये आहे.

)







