नवी दिल्ली, 04 मार्च : सर्वोच्च न्यायालयाने क्रिप्टोकरन्सीबाबत मोठा निर्णय देत त्यावर लादण्यात आलेले सर्व निर्बंध हटवले आहेत. आता देशातील सर्व बँका याची देव-घेव करू शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2018 मध्ये एक पत्रक जारी करून क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांवर निर्बंध घातले होते. सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानंतर भारतीयांनासुद्धा बिटकॉइनसारखी क्रिप्टोकरन्सी खरेदी आणि विक्री करण्याची मुभा मिळणार आहे. आरबीआयच्या पत्रकाने घातलेल्या निर्बंधांना आव्हान देण्यासाठी इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयात सुवाणीवेळी याचिका कर्त्यांनी सांगितलं की, केंद्रीय बँकेच्या निर्बंधामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये होणाऱ्या वैध व्यवहारांवरही मर्यादा आल्या. यावर आरबीआयने न्यायालयात उत्तर दिलं. त्यात म्हटलं की, क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ पुरवलं जाण्याचा धोका असल्यानं हे पाऊल उचललं.
#NewsAlert | Doors ajar for virtual currency in India. Supreme Court quashes complete ban on crypto-currency. RBI's 2018 circular declared unreasonable, disproportionate & RBI's ban on banks to deal with crypto-currency set aside by SC. pic.twitter.com/1w0sFwUOYY
— News18 (@CNNnews18) March 4, 2020
बिटकॉईनला भारतात बंदी भारतात यापूर्वी बिटकॉईनचा बोलबाला होता. अनेकांनी त्यामध्ये गुंतवणूक देखील केली. त्यासंदर्भातील काही व्हिडीओ देखील समोर आले होते. त्यानंतर या साऱ्या प्रकरणाची भारत सरकारनं गंभीर दखल घेत देशात बिटकॉईनवर बंदी घातली. शिवाय, गुंतवणूकदारांना खबरदारीचं आवाहन देखील केलं होतं. हे वाचा : आयकर विभागाकडून अलर्ट! पॅन-आधार लिंक न केल्यास भरावा लागणार 10 हजारांचा दंड