लॉकडाऊनमध्ये 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात, मेपासून तीन महिन्यांसाठी घेतला निर्णय

लॉकडाऊनमध्ये 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात, मेपासून तीन महिन्यांसाठी घेतला निर्णय

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने (IndiGo) कोरोना संकटकाळात कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याचा निर्णय घेतला आहे. मे महिन्याासून तीन महिन्यांसाठी ही कपात होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 मे : इंडिगोचे सीईओ रोनोजॉय दत्ता (IndiGo CEO Ronojoy Dutta) यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना मेलद्वारे कळवले आहे की, मे महिन्यापासून पगार कपात लागू करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय त्यांच्याकडे शिल्लक राहिलेला नाही. आम्हाला मे, जून आणि जुलै महिन्याकरता श्रेणीबद्ध लिव्ह विदाऊट पे (Leave Without Pay) लागू करावे लागणार आहे.  त्यांनी अशी माहिती दिली की, ही बिनपगारी रजा कर्मचाऱ्यांच्या ग्रृपच्या आधारे 1.5 ते 5 दिवसांची असेल. विमान कंपनीच्या वर्कफोर्सचा मुख्य हिस्सा असणारे ए स्तरावरील कर्मचारी या निर्णयामुळे प्रभावित होणार नाहीत. याआधी एप्रिलमध्ये कंपनीने केलेली पगार कपातीची घोषणा कुणीही वेतन कपात करू नये या सरकारच्या आदेशानंतर मागे घेतली होती. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सर्वच विमान कंपन्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

(हे वाचा-मोठी बातमी! कोरोना बाधित रुग्ण सापडल्यामुळे मुंबईतील SEBI चे मुख्यालय बंद)

कोरोनाच्या संकटकाळात सर्वात जास्त नुकसान विमान कंपन्यांचे झाले आहे. या काळामध्ये आतंरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवा बंद आहेत. परिणामी विमान कंपन्यांनी आर्थिक बाजू कमकुवत पडत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर विमान कंपन्यांना त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत.

इंडिगो व्यतिरिक्त स्पाइसजेट आणि गोएअरने देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात केली आहे तसंच अनेक कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजेवर पाठवले आहे. गोएअरकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार देखील देण्यात आलेला नाही. विमान कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना असे कळवले आहे की, लॉकडाऊनचा दुसरा महिना सुरू आहे. आशा करतो की तुम्ही सर्वजण सुरक्षित आहात आणि परिस्थिती समजणारे आहात. कोरोनामुळे देशभरात 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. गोएअरने 31 मेपर्यंत फ्लाइट्सचे बुकिंग रद्द केले आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: May 8, 2020, 4:27 PM IST

ताज्या बातम्या