चांदी 1400 रुपयांनी महागली तर सोन्याला झळाळी कायम, वाचा काय आहेत आजचे भाव

चांदी 1400 रुपयांनी महागली तर सोन्याला झळाळी कायम, वाचा काय आहेत आजचे भाव

आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये (Gold and Silver Prices Today) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जून : आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. (Gold and Silver Prices Today). सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढले आहेत. परिणामी मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात देखील सोन्याचे भाव वाढलेले पाहायला मिळाले. एचडीएफसी सिक्योरिटीज (HDFC Securities) च्या मते मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 119 रुपयांनी वाढले आहेत. त्याचप्रमाणे औद्योगिक मागणी वाढल्यामुशे चांदीच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आज चांदीचे भाव प्रति किलो 1408 रुपयांनी वाढले आहेत.

काय आहेत सोन्याचे नवे भाव (Gold Price on 30th June 2020)

एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव 119 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे प्रति तोळा सोन्याची नवीन किंमत 49,306 रुपये इतकी झाली आहे.

(हे वाचा-भारतीयांना दिलासा! इतर देशांच्या तुलनेत कोरोना काळातही होतेय अधिक नोकरभरती-अहवाल)

याआधी सोमवारी सोन्याच्या किंमतीमध्ये प्रति तोळा 26 रुपयांची घसरण झाली होती.

काय आहेत चांदीचे नवे भाव (Silver Price on 30th June 2020)

सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किंमतीमध्ये अधिक तेजी पाहायला मिळाली. औद्योगिक मागणी पुन्हा एकदा वाढल्यामुळे चांदी वधारली आहे.  चांदीचे भाव प्रति किलो 1408 रुपयांनी वाढल्यामुळे दर प्रति किलो 49,483 रुपयांवर पोहोचले आहेत.

सोनं खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

1. सोन्याच्या शुद्धतेनुसार सोन्याचे दागिने सुद्धा वेगवेगळ्या कॅरेटमध्ये येतात. 24 कॅरेट सोनं सगळ्यात शुद्ध सोनं असतं. 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमध्ये 91.6 टक्के सोन्याची शुद्धता असते.

2. सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती दोन गोष्टींवरून ठरतात- एक म्हणजे दागिन्यामध्ये सोन्याचा हिस्सा काय आहे. उदा. 22 कॅरेट की 18 कॅरेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दागिने बनवण्यासाठी सोन्यामध्ये मिसळण्यात येणारा धातू.

(हे वाचा-सुशांत सिंह राजपूतला 'शुद्ध देसी रोमान्स'साठी मिळाले होते 30 लाख)

(हे वाचा-आलिया आणि महेश भट्ट सोशल मीडियावर ट्रोल, 'सडक 2' पोस्टर लाँचनंतर नेटकरी संतापले)

First published: June 30, 2020, 6:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading