जाहिरात
मराठी बातम्या / मनी / भारतीयांना दिलासा! इतर देशांच्या तुलनेत कोरोनाच्या संकटकाळात होतेय सर्वाधिक नोकरभरती- अहवाल

भारतीयांना दिलासा! इतर देशांच्या तुलनेत कोरोनाच्या संकटकाळात होतेय सर्वाधिक नोकरभरती- अहवाल

भारतीयांना दिलासा! इतर देशांच्या तुलनेत कोरोनाच्या संकटकाळात होतेय सर्वाधिक नोकरभरती- अहवाल

कोरोनाच्या संकटकाळात अनेकांची पगारकपात झाली आहे तर काहींनी नोकऱ्या गमावल्या आहेत. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये जास्त प्रमाणात नोकरभरती होत आहे. एका अहवालात ही बाब समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली,  30 जून : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus)जगभरातील व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेकांना पगारकपातीचा सामना करावा लागत आहे तर अनेकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना बिनपगारी सुट्टीवर पाठवले आहे. अनेक क्षेत्रांमध्ये तर नोकरभरतीच होत नाही आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये जास्त प्रमाणात नोकरभरती होत आहे. एका अहवालात ही बाब समोर आली आहे. ग्‍लोबल जॉब साइट इनडीडने त्यांच्या अहवालात हे स्पष्ट केले आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जॉब पोस्टिंगचा ट्रेंड गेल्यावर्षी प्रमाणेच होता. मार्चच्या दुसऱ्या भागात यामध्ये सुस्ती पाहायला मिळाली. यामध्ये एप्रिल ते जून दरम्यान आणखी वाढ झाली. हे स्पष्ट आहे की, लॉकडाऊनचा मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आहे. अहवालानुसार, जूनच्या मध्यापर्यंत Indeed India वर जॉब पोस्टिंगवर गेल्या वर्षाच्या तुलनेत 51 टक्क्याने घसरण झाली आहे. ब्रिटनमध्ये ही घसरण 60 टक्के तर युरोपातील काही देशांमध्ये ही घसरण 61 टक्के आहे. (हे वाचा- 1 जुलैपासून बदलणार आर्थिक व्यवहारासंबंधित हे नियम,माहित नसल्यास होईल मोठे नुकसान) काही देशांमध्ये भारतमध्ये जॉब पोस्टिंगच्या दरात जास्त घसरण झाली असली तरीही काही देश असे आहेत की ज्याठिकाणी हा आकडा भारतापेक्षाही कमी आहे. अमेरिका, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियाचा देखील यामध्ये समावेश आहे. अमेरिकेत जॉब पोस्टिंगमध्ये केवळ 29 टक्के घसरण झाली आहे. तर सिंगापूरमध्ये 32 तर ऑस्ट्रेलियामध्ये 42 टक्के घसरण झाली आहे. या सेक्टरमधील लोकांना नोकरी मिळण्याची शक्यता जास्त हा अहवाल फेब्रुवारी ते मे पर्यंत इनडीड प्लॅटफॉर्मवरील डेटावर आधारित आहे. जगभरात कोव्हिड-19 मुळे अर्थव्यवस्था बिघडत चालली आहे. कोरोनाचा परिणाम विविध क्षेत्रांवर झाला आहे. दरम्यान या कालावधीमध्ये सॉफ्टवेयर टेक्‍नॉलॉजी, मेडिकल प्रोफेशनल आणि मार्केटिंग या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी वाढल्या देखील आहेत. (हे वाचा- कोरोनाच्या संकटकाळात पैशांची गरज भासल्यास नो टेन्शन! घरबसल्या SBI देत आहे कर्ज )

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात