मुंबई, 30 जून : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)च्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. दरम्यान या प्रकरणात व्यावसायिक दुश्मनीबाबत तपास करताना वांद्रे पोलिसांच्या हाती यशराज फिल्म बरोबरच्या त्याच्या कॉन्ट्रॅक्टची कॉपी लागली आहे. यानुसार सुशांत सिंह राजपूतचा यशराजबरोबर तीन चित्रपटांचा करार झाला होता. या कराराअंतर्गत सुशांतला पहिल्या चित्रपटासाठी 30 लाख रुपये मिळणार होते. वायआरएफ बरोबरचा पहिला चित्रपट हिट झाल्यास त्याला दुसऱ्या चित्रपटासाठी 60 लाख रुपये मिळणार होते, तर दुसराही चित्रपट हिट झाल्यास तिसऱ्या चित्रपटासाठी 1 कोटी मानधन मिळणार होते. मात्र चित्रपट हिट आहे की फ्लॉप हे यशराजकडून ठरवले जाणार होते. न्यूज18 हिंदी ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. यशराज बॅनरखाली सुशांत सिंह राजपूतचा पहिला सिनेमा ‘शुद्ध देसी रोमान्स’ हा होता. ज्यामध्ये परिणीती चोप्रा आणि वाणी कपूरबरोबर सुशांतने स्क्रीन शेअर केली होती. कराराअंतर्गत या चित्रपटासाठी सुशांतला 30 लाख रुपये मानधन देण्यात आले होते. यानंतर यशराज बरोबर सुशांतची दुसरी फिल्म आली ती म्हणजे ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्शी’. दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित या चित्रपटासाठी सुशांतला 1 कोटी रुपये देण्यात आले होते. (हे वाचा- आलिया आणि महेश भट्ट सोशल मीडियावर ट्रोल, ‘सडक 2’ पोस्टर लाँचनंतर नेटकरी संतापले ) ही गोष्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये स्पष्ट करण्यात आली नव्हती की, जर दुसऱ्या चित्रपटासाठी सुशांतला 60 लाख रुपये देणं निश्चित करण्यात आले होते तर त्यांना दुसऱ्याच चित्रपटावेळी 1 कोटी रुपये का देण्यात आले. यशराजबरोबर सुशांत ‘पानी’ हा तिसरा चित्रपट करणार होता. शेखर कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. मात्र हा चित्रपट बनला नाही. पोलिसांना दिलेल्या जबाबात यशराजकडून असे सांगण्यात आले आहे की, हा चित्रपट बनला नाही कारण शेखर कपूर आणि आदित्य चोपडा यांच्यामध्ये क्रिएटिव्ह स्तरावर या चित्रपटाबाबत काही मतभेद निर्माण झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.