110 महिन्यात होणार पैसे दुप्पट, जाणून घ्या मोदी सरकारची ही योजना

110 महिन्यात होणार पैसे दुप्पट, जाणून घ्या मोदी सरकारची ही योजना

सध्या कोरोनाच्या संकटकाळात सरकारच्या स्मॉल सेव्हिंग्स स्कीम्स (Small Savings Schemes) मध्ये बचत करणे एक चांगला पर्याय ठरू शकतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 एप्रिल : कोरोना (Coronavirus)च्या संकटातून देशाला वाचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांचे विविध प्रयत्न सुरु आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा लोकांची आर्थिक स्थिती कोलमडू नये याकरता प्रयत्नशील आहे. सध्या विविध प्रकारच्या व्याजदरांमध्ये तर कपात होतच आहे. त्याचप्रमाणे इक्विटी मार्केटमध्ये सुद्धा चांगले रिटर्न्स मिळत आहेत. दरम्यान या परिस्थितीत सरकारच्या स्मॉल सेव्हिंग्स स्कीम्स (Small Savings Schemes) मध्ये बचत करणे एक चांगला पर्याय ठरू शकतो. केंद्र सरकारने छोट्या बचतीवर मिळणार व्याजदर जरी घटवले असले तरीही इतर योजनांपेक्षा हा व्याजदर अधिक आहे. त्याचप्रमाणे सरकारी गॅरंटी मिळत असल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी जोखीम कमी आहे.

(हे वाचा-'हापूस'च्या युरोपवारीवर कोरोनामुळे बंधनं, बागायतदारांमध्ये चिंतेचं वातावरण

किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) ही मोदी सरकारची योजना या छोट्या बचतींपैकी एक आहे. मोदी सरकारने जूनच्या तिमाहीमध्ये किसान विकास पत्रमध्ये मिळणारा व्याजदर घटवून तो 6.9 टक्क्यांवर आणला आहे. छोट्या बचतीसाठी किसान विकास पत्र सामान्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ही योजना घेऊ शकता

किसान विकास पत्र योजनेमध्ये दुप्पट होणार पैसा?

काही दिवसांपूर्वीच वित्त मंत्रालयाने किसान विकास पत्रमध्ये मिळणाऱ्या व्याजदरामध्ये कपात केल्याची घोषणा केली आहे. सरकार प्रत्येक तीन महिन्यासाठी व्याजदर निश्चित करते. 6.9 व्याजदराच्या आधारावर या योजनेअंतर्गत 9 वर्ष 2 महिन्यांमध्ये तुमचे पैसे दुप्पट होतील. म्हणजेच 110 महिन्यात पैसे दुप्पट होतील. याआधी 9 वर्ष 5 महिने अर्थात 113 महिन्यात पैसे दुप्पट होत असत.

काय आहे किसान विकास पत्र?

हे एकप्रकारचे प्रमाणपत्र असतं, जे तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकता. बाँडप्रमाणेच प्रमाणपत्राच्या रुपात ते जारी करण्यात येतं. सरकारकडून एका निश्चित स्वरूपात व्याज या योजनेअंतर्गत मिळते. तुम्ही याची खरेदी अल्पवयीन मुलासाठी देखील करू शकता. 2 जणांच्या नावावर देखील याची खरेदी करता येईल. यासाठी 2 पासपोर्ट साइझ फोटो, ओळखपत्र (रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट इ.) निवास प्रमाणपक्ष (वीजबिल, टेलिफोन बिल, बँक पासबूक इ.) या कागदपत्रांची गरज लागेल. जर गुंतवणूक 50 हजारांपेक्षा जास्त असेल तर पॅन कार्ड देखील आवश्यक आहे.

या योजनेत किती गुंतवणूक करू शकाल?

किसान विकास पत्रमध्ये तुम्ही कमीत कमी 1000 आणि जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करू शकता. पैसे काढण्यासाठी तुम्हाला 110 महिन्यांची वाट पाहावी लागेल. फायनान्शिअल एक्सपर्ट यामध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्याचे सुचवतात.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: April 18, 2020, 10:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading