नवी दिल्ली, 18 एप्रिल : एलआयसी (LIC)च्या काही योजना अशा आहेत की ज्या बचतीसाठी आहेत. तर काही योजनांचा लाभ सुरक्षेसाठी होतो. मात्र एलआयसीची अशी एक योजना आहे ज्यामुळे तुम्हाला बचत आणि सुरक्षा दोन्ही गोष्टी मिळू शकतील. LIC ची न्यू जीवन आनंद पॉलिसी अंतर्गत तुम्ही बचतही करू शकता आणि तुम्हाला सुरक्षा देखील मिळू शकते. या योजनेअंतर्गत बोनसही मिळतो त्याचप्रमाणे या योजनेतील रिस्क कव्हर पॉलिसी अवधीनंतरही मिळतो.
(हे वाचा-110 महिन्यात होणार पैसे दुप्पट, जाणून घ्या मोदी सरकारची ही योजना)
जर तुमचे वय 18 वर्ष ते 50 वर्षांपर्यंत असेलतर तुम्ही ही योजना घेऊ शकता. या योजनेअंतर्गत कमीत कमी 1 लाख रुपयांचा सम अश्योर्ड घेणे आवश्यक आहे. याकरता अधिकची मर्यादा नाही आहे. म्हणजेच जास्तीत जास्त कितीही सम अश्योर्ड तुम्ही घेऊ शकता. या पॉलिसीचा अवधी 15 ते 35 वर्ष इतका आहे. LIC ची न्यू जीवन आनंद पॉलिसी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता.
या पॉलिसीकरता वार्षिक, सहा महिन्यांनी, तिमाही किंवा मासिक आधारावर तुम्ही प्रीमियम भरू शकता. या योजनेतील विशेष बाब म्हणजे पॉलिसी खरेदी केल्याच्या 3 वर्षानंतर तुम्ही पॉलिसीतून कर्ज घेऊ शकता.
मॅच्युरिटीवर किती लाभ मिळणार?
सम अश्योर्डबरोबर सिंपल रिव्हर्सनरी बोनस आणि फायनल अडिशनल बोनस मिळेल.
उदा. सम अश्योर्ड + सिंपल रिव्हर्सनरी बोनस + फायनल अडिशनल बोनस
5 लाख + 5.04 लाख + 10 हजार = 10.14 लाख
21 वर्षानंतर पॉलिसीधारक हयात असल्यास त्याला 10 लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळेल.
(हे वाचा-COVID-19 : बँक, कृषि क्षेत्र आणि सामान्य नागरिकांसाठी RBIचे महत्त्वाचे निर्णय)
मॅच्युरिटीमध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला सम अश्योर्ड 5 लाख रुपये मिळतील. जर पॉलिसी सुरू असताना पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला विमा रकमेच्या 125 टक्के देण्यात येतील. त्याचप्रमाणे बोनस आणि फायनल बोनस देखील मिळेल.
जर 17 वर्ष प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास खालीलपैकी ज्यामध्ये जास्त रक्कम असेल ती पॉलिसीधारकाला मिळेल
1. सम अश्योर्डचे 125% = 5 लाखांचे 125%= 6,25,000
2. वार्षिक प्रीमियमच्या 10 पट = 27010 च्या 10 पट = 2,70,100
3. मृत्यू होईपर्यंत भरलेल्या प्रीमियमच्या 105% = (प्रति महिना 27010 रुपये 17 महिन्यांसाठी) च्या 105% = 4,82,128
यामध्ये पहिल्या पर्यायाची रक्कम सर्वाधिक आहे, ती नॉमिनीला मिळेल.
या योजनेमध्ये आयकर अधिनियम कलम 80C अंतर्गत प्रीमियम भरण्यासाठी टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतो. मॅच्युरिटी किंवा मृत्यू झाल्यानंतर मिळणाऱ्या रकमेवर टॅक्स भरावा लागत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.