मराठी बातम्या /बातम्या /मनी /

रुपया घसरल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी सोनं उतरलं, गुरूवारचे दर इथे वाचा

रुपया घसरल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी सोनं उतरलं, गुरूवारचे दर इथे वाचा

सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर. काल महाग झालेलं सोनं आज 400 रुपयांनी कमी झालंय. सोन्यामध्ये घसरण होऊन 35,400 रुपयांनी प्रति 10 ग्रॅमवर सोनं आलंय.

सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर. काल महाग झालेलं सोनं आज 400 रुपयांनी कमी झालंय. सोन्यामध्ये घसरण होऊन 35,400 रुपयांनी प्रति 10 ग्रॅमवर सोनं आलंय.

सोनेखरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर (Gold Prices today) कमी झाले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसल्यामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 12 मार्च : सोनेखरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर (Gold Prices today) कमी झाले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसल्यामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. दिल्लीतील सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याची किंमत 128 रुपयांनी घसरली आहे. बुधवारी प्रति तोळा सोन्याची किंमत 516 रुपयानी घसरली होती. प्रति किलो चांदीच्या किंमतीतही (Silver prices today) 302 रुपयांची घसरण झाली आहे.

सोन्याचे नवे भाव

गुरूवारी दिल्लीतील सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याची किंमत 128 रुपयांनी घसरल्यानंतर प्रति तोळा सोन्याची किंमत (gold prices today) 44, 490 रुपये झाली आहे.

(हे वाचा- 'कोरोना'मुळे शेअर बाजार गडगडला, जाणून घ्या घसरण होण्याची 5 महत्त्वाची कारणं)

बुधवारी सोन्याची किंमत 44,618 रुपये प्रति तोळा होती. आतंरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,645 डॉलर प्रति औंस आहे.

चांदीचे नवे भाव

सोन्यापाठोपाठ चांदीच्या किंमतीतही घसरण झाली आहे. आज चांदीचे दर प्रति किलो 516 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचे आजचे दर प्रति किलो 46,868 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचा दर प्रति किलोमागे 146 रुपयांनी वाढला होता.

सोन्याचांदीच्या किंमतीत घसरण होण्याचं कारण

HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्ये 128 रुपयांची घसरण झाली आहे.

(हे वाचा- EPFOच्या पेन्शनधारकांसाठी खूशखबर, लाइफ सर्टिफिकेटच्या नियमांत महत्त्वाचे बदल)

रुपयाच्या मुल्यामध्ये झालेल्या घसरणीमुळे सोन्याच्या किंमती मर्यादित स्वरूपात कमी झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 53 पैशांनी घसरला आहे.

First published: