नवी दिल्ली, 12 मार्च : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 64 लाख पेन्शनधारकांसाठी खूशखबर दिली आहे. EPFO ने लाइफ सर्टिफिकेट (Life Certificate) जमा करण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. पेन्शन मिळवण्यासाठी पेन्शनधारक त्यांच्या सोयीनुसार वर्षभरात कधीही ऑनलाइन लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकणार आहेत. लाइफ सर्टिफिकेट सबमिशनमध्ये झालेल्या बदलांमुळे कर्मचारी पेन्शन योजना (EPS), 1995च्या 64 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
लाइफ सर्टिफिकेटची वैधता एका वर्षाची असणार
EPFO ने त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, पेन्शनधारक त्यांच्या सोयीनुसार वर्षभरात कधीही लाइफ सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतात. जमा केल्याच्या तारखेनंतर वर्षभरासाठी हे लाइफ सर्टिफिकेट वैध असेल. लाइफ सर्टिफिकेट म्हणजेच जीवन प्रमाणपत्र हे पेन्शनधारक जिवंत असल्याचा पुरावा असतो.
EPS Pensioners who have not submitted their #DigitalLifeCertificate yet can now submit online Life Certificate during any time of the year. The #LifeCertificate will remain valid for 1 year from the date of its submission#EPFO pic.twitter.com/KiSGBjy380
— EPFO (@socialepfo) March 12, 2020
हे सर्टिफिकेट जमा न केल्यास पेन्शन मिळणं बंद देखील होऊ शकतं. आतापर्यंत पेन्शनधारकांना नोव्हेंबर महिन्याते हे सर्टिफिकेट द्यावं लागायचं, ज्या बँक खात्यामध्ये पेन्शन जमा होते. जर कुणी नोव्हेंबरमध्ये लाइफ सर्टिफिकेट जमा नाही केलं तर जानेवारीपासून त्यांचं पेन्शन थांबवलं जायचं. मात्र EPFO च्या या योजनेंतर वर्षभराच कधीही जीवन प्रमाणपत्र जमा करता येणार आहे.
(हे वाचा-भारतात 3 गुहांमध्ये लाखो टन कच्च्या तेलाचा साठा, केंद्राचा महत्त्वाचा निर्णय)
कसं मिळवाल ऑनलाइन लाइफ सर्टिफिकेट?
ईपीएफओ ऑफिसमध्ये जाऊन डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सबमिट करता येणार आहे. पेन्शन डिस्बर्सिंग बँक, उमंग अप किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून देखील लाइफ सर्टिफिकेट जमा करता येणार आहे. डिजिटल लाइफ सर्टिफिकेट बनवण्यासाठी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन जरूरी आहे. यासाठी तुम्हाला आधार कार्ड नंबर (Aadhar Card Number), पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO), बँक अकाउंट डिटेल्स आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर असणं जरूरी आहे. CSC, बँक आणि सरकारी कार्यालयांमध्ये चालवण्यात येणाऱ्या जीवन प्रमाण सेंटरच्या माध्यमातून डिजिटल लाइफ सर्टिफिकेशनसाठी रजिस्ट्रेशन करता येईल. कंप्यूटर, मोबाइल किंवा टॅबवर क्लायंट अॅप्लिकेशन डाउनलोड करून सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. याची पूर्ण माहिती jeevanpramaan.gov.in वर उपलब्ध आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pensioners