• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • सरकारी कंपनी देतेय कमाईची सुवर्णसंधी! केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर, दोनच दिवस आहे ऑफर

सरकारी कंपनी देतेय कमाईची सुवर्णसंधी! केवळ 45 रुपयात खरेदी करा शेअर, दोनच दिवस आहे ऑफर

हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, म्हणजेच हुडको (HUDCO) या सरकारी कंपनीमधील आपले 8 टक्के शेअर्स केंद्र सरकार (Central government shares) विकत आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 27 जुलै: कोरोनामुळे (Coronavirus in India) बरेच लोक आता पैशांच्या बचतीसोबतच गुंतवणुकीचाही (Investment Plans) विचार करू लागले आहेत. बचत कधी ना कधी संपते, मात्र गुंतवणूक वाढत जाते हे आता लोकांच्या लक्षात आलं आहे. तुम्हीही जर शेअर बाजारात गुंतवणूक (Share market investment) करण्याचा विचार करत आहात, तर सध्या तुमच्याकडे चांगली संधी आली आहे. सरकारी कंपनीमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता. हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, म्हणजेच हुडको (HUDCO) या सरकारी कंपनीमधील आपले 8 टक्के शेअर्स केंद्र सरकार (Central government shares) विकत आहे. यात एकूण 16.01 कोटी शेअर्सची ऑफर फॉर सेलमधून (OFS) विक्री करण्यात येणार आहे. मंगळवारपासून (27 जुलै) या शेअर्सची विक्री करण्यात येणार आहे. यातून सरकार सुमारे 720 कोटी रुपये उभारणार आहे. अवघ्या 45 रुपयांना एक शेअर रेग्युलेटरी फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हुडकोच्या एका शेअरची किंमत (HUDCO share price) अवघी 45 रुपये असणार आहे. सरकार ऑफर फॉर सेल (ओएफएस) च्या माध्यमातून 2.5 टक्के किंवा 5 कोटींपेक्षा जास्त शेअर्सची सदस्यता राखण्याच्या पर्यायासह 5 टक्क्यांपेक्षा जास्त भागभांडवल किंवा 11.01 कोटी शेअर्सची विक्री करीत आहे. हे वाचा-सोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम केवळ उद्यापर्यंत सुरू असणार ओएफएस गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (DIPAM) सचिव तुहीन कांता पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकोमधील भारत सरकारच्या इक्विटीच्या विक्रीचा प्रस्ताव आजपासून नॉन रीटेल गुंतवणूकदारांसाठी (Non-retail investors) खुला केला जाईल. त्याचबरोबर उद्यापासून (28 जुलै) रिटेल गुंतवणूकदार (Retail investors) त्यात पैसे गुंतवू शकतील. ग्रीन शू पर्याय (Green shoe option) म्हणून सरकार अतिरिक्त 2.5 समभागांसोबत 5.5 टक्के शेअर्सची विक्री करणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नगरविकास मंत्रालयामार्फत हुडको शेअर्सच्या (HUDCO Shares) विक्रीस मान्यता दिली आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच 27 जुलै रोजी 11.01 कोटी शेअर्स विकले जातील, ज्यासाठी प्रति शेअरची फेस व्हॅल्यू (HUDCO share face value) 10 रुपये असेल. हे सरकारचे सुमारे 5.5% भागभांडवल असेल. हे वाचा-ग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट या पूर्वी बीएसई सेन्सेक्समध्ये हुडकोच्या शेअरची किंमत 6.22 टक्क्यांनी कोसळून 47.50 रुपयांवर तो बंद झाला होता. ओएफएससाठी याची फ्लोअर प्राईज त्याहून कमी, म्हणजेच 45 रुपये ठेवण्यात आली आहे.
First published: