Home /News /money /

Gold Rates Today: सलग दुसऱ्या दिवशी उतरले सोन्याचे दर, वाचा काय आहे नवे भाव

Gold Rates Today: सलग दुसऱ्या दिवशी उतरले सोन्याचे दर, वाचा काय आहे नवे भाव

Gold Silver Rates on 23rd December 2020: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचांदीचे दर कमी झाल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी देशांतर्गत बाजारातही सोन्याचांदीचे भाव कमी झाले आहेत.

    नवी दिल्ली, 23 डिसेंबर: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचांदीचे दर कमी झाल्याने देशांतर्गत बाजारातही सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचांदीचे दर (Gold and Silver Price Today) कमी झाले आहेत. देशातील सराफा बाजारात सोनं आणि चांदीचे दर आजही उतरले आहेत. कालच्या घसरणीनंतर आजही सोन्याचांदीच्या किंमतीवर दबाव कायम आहे. 23 डिसेंबर रोजी एमसीएक्सवर (MCX) सोन्याच्या दरात जवळपास  34.00 रुपयांची घसरण झाली आहे, या घसरणीनतर सोन्याचे दर 50047.00 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होते. तर चांदीच्या दरातही  143.00 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर चांदी 66728.00 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होती. शेअर बाजारातील तेजीमुळे आणखी कमी होती किंमती गेले काही दिवस शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात उसळी पाहायला मिळते आहे. अॅक्सिस सिक्योरिटीजच्या मते येणाऱ्या काळातही सोन्यावरील दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता शक्यता नाही आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करत बुधवारी सोन्यामध्ये किरकोळ वाढ पाहायला मिळाली. स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्याने वाढून 1863.83 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. तर यूएस गोल्ड फ्यूचर ची किंमत 0.1 टक्क्याने कमी होऊन 1868.10 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. (हे वाचा-कोरोना काळात बँक संबंधित कामासाठीही घराबाहेर पडू नका! या ग्राहकांसाठी विशेष सेवा) जगातील सर्वात मोठ्या गोल्ड ईटीएफ एसपीडीआर गोल्ड ट्रस्टची होल्डिंग 0.20 टक्क्याने कमी होऊन 1167.53 टनवर पोहोचली आहे. मंगळवारी ही 1169.86 टन होती. या दरम्यान चांदीची किंमती 1 टक्क्याने वाढून 25.83 डॉलर प्रति औंस झाली आहे. सोन्याचांदीचे दर दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचे दर 243 रुपये प्रति तोळाने कमी झाले होते. यानंतर 99.9  शुद्धतेच्या सोन्याची किंमत 49,653 रुपये प्रति तोळा पोहोचली होती. (हे वाचा-COVID-19: मोठी बातमी! पुढील आठवड्यात सरकार 'या' लशीला मंजुरी देण्याची शक्यता) सोन्यापाठोपाठ काल चांदीमध्येही किरकोळ घसरण झाली. दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी चांदीच्या दरांत 216 रुपयांची घसरण झाल्यानंतर चांदीचे दर प्रति किलो 67,177  रुपये झाले होते. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस (Motilal Oswal Financial Services) चे व्हाइस प्रेसिडेंट (कमोडिटीज) नवनीत दमानी यांच्या मते, सोन्याचांदीच्या आंतरराष्ट्रीय किंमतीमध्ये घसरण झाल्यामुळे भारतीय बाजारात देखील त्याचा परिणाम पाहायला मिळाला.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या