मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /COVID-19 Vaccine संदर्भात सर्वात मोठी बातमी! पुढील आठवड्यात सरकार 'या' लशीला मंजुरी देण्याची शक्यता

COVID-19 Vaccine संदर्भात सर्वात मोठी बातमी! पुढील आठवड्यात सरकार 'या' लशीला मंजुरी देण्याची शक्यता

COVID-19 Vaccine: मीडिया अहवालानुसार कोरोनाशी लढण्यासाठी अ‍ॅस्ट्रोजेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठ द्वारे निर्मित लशीला सरकार पुढील आठवड्यात मंजुरी देईल.

COVID-19 Vaccine: मीडिया अहवालानुसार कोरोनाशी लढण्यासाठी अ‍ॅस्ट्रोजेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठ द्वारे निर्मित लशीला सरकार पुढील आठवड्यात मंजुरी देईल.

COVID-19 Vaccine: मीडिया अहवालानुसार कोरोनाशी लढण्यासाठी अ‍ॅस्ट्रोजेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठ द्वारे निर्मित लशीला सरकार पुढील आठवड्यात मंजुरी देईल.

नवी दिल्ली, 23 डिसेंबर: जगभरात कोरोनाचा (Coronavirus) हाहाकार थांबण्याचं नाव नाही घेत आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये विविध लशींवर चाचणी (Covid-19 vaccine) सुरू आहे. रशिया, ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये लसीकरणाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. दरम्यान मीडिया अहवालानुसार कोरोनाशी लढण्यासाठी AstraZeneca आणि ऑक्सफर्ड यूनिवर्सिटीच्या व्हॅक्सिनला पुढील आठवड्यात सरकारकडून मंजुरी मिळू शकते. स्थानिक निर्मात्यांद्वारे अतिरिक्त आकडेवारी उपलब्ध केल्यानंतर सरकारकडून या लशीला मंजुरी मिळण्याचे संकेत आहेत.

भारतात कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता पुढील महिन्यापासूनच नागरिकांना लस देण्याचा सरकारचा मानस आहे. फायझर इंक आणि स्थानिक कंपनी बायोटेक द्वारे बनवण्यात आलेल्या लशीच्या आपात्कालीन उपयोगाचाही सरकार विचार करत आहे. भारताने याआधीच AstraZeneca च्या पाच कोटींपेक्षा अधिक लशींची निर्मिती केली आहे.

भारताच्या सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने सुरुवातीला 9 डिसेंबर रोजी तीन अर्जांचा आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर सीडीएससीओने अ‍ॅस्ट्रॅजेनेका शॉट्स तयार करणार्‍या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) सह सर्व कंपन्यांकडून अधिक माहिती मागितली.

(हे वाचा-कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळे भारतात Alert, असे आहेत आरोग्यमंत्रालयाचे नवे नियम)

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने भारतात लस तयार केली जात आहेत. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक एसआयआयने आता सर्व आकडेवारी उपलब्ध करुन दिली आहे. सरकारी आरोग्य सल्लागाराने मंगळवारी एका ब्रिफिंगमध्ये सांगितले की, अधिकारी फाइझरच्या लशीबाबक अधिक तपशिलाची वाट पाहत होते.

ब्रिटनने सर्वात आधी दिली लशीला मंजुरी

ब्रिटनने सर्वात आधी फायझर (Pfizer) आणि बायोएनटेक (BioNTech) लशीला मंजुरी दिली आहे. सामान्य नागरिकांसाठी  त्याठिकाणी लस उपलब्ध करून दिली जात आहे. फायझर आणि बायोएनटेकच्या लशीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिला देश बनला आहे.

(हे वाचा-एअर इंडियाच्या प्रवाशांना फ्रीमध्ये करता येईल तिकिट रिशेड्यूल,या कालावधीसाठी ऑफर)

ब्रिटनच्या औषधं आणि आरोग्य उत्पादक नियामक एजन्सी HMRA ने असं म्हटलं आहे की, ही लस वापरण्यास सुरक्षित आहे. असा दावा केला जात आहे की कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी ही लस 95 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. प्रसिद्ध आणि अमेरिकन औषधनिर्माण संस्था फायझर आणि जर्मन कंपनी बायोएनटेक यांनी एकत्रितपणे ही लस विकसित केली आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus