नवी दिल्ली, 30 जुलै: सोन्याच्या किंमतीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढ झाल्यानंतर देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर (Gold Price Today) वधारले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Rates) 294 रुपये प्रति तोळाने वधारले आहेत. या वाढीनंतर सोनं 47,442 रुपये प्रति तोळावर पोहोचलं आहे. एचडीएफसी सिक्योरिटीज (HDFC Securities) ने याबाबत माहिती दिली आहे. आधीच्या सत्रात बाजार बंद होत असताना सोन्याचे दर 47,148 रुपये प्रति तोळा होते.
दरम्यान चांदीचे दर (Silver Price Today) 170 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. यानंतर चांदीचे दर (Silver Rates) 66,274 रुपये प्रति किलोग्रॅमने कमी झाले आहेत. आधीच्या सत्रात बाजार बंद होत असताना चांदीचे दर 64,444 रुपये प्रति किलो होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे (Gold Rates in International Market) दर 1,830 डॉलर प्रति औंस आहेत, तर चांदीचे दर 25.57 डॉलर प्रति औंस आहेत.
हे वाचा-एफडीवर SBI, HDFC Bank आणि ICICI Bank पैकी कोण देतंय चांगलं व्याज? तपासा इथे
का वाढले सोन्याचे दर
एचडीएफसी सिक्योरिटीज (HDFC Securities) चे सीनियर एनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, एफओएमसीच्या बैठकीनंतर सोन्यात जोरदार खरेदी दिसून आली. डॉलर निर्देशांक चार आठवड्यांच्या निचांकी पातळीवर आला आहे, त्यामुळे सोन्याची खरेदी वाढली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्हीपी कमोडिटीज रिसर्च नवनीत दमानी यांच्या मते, अमेरिकन फेडरल गव्हर्नरनी व्याजदर वाढ न होण्याबाबत दृष्टिकोन ठेवल्याने सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे, ज्यामुळे सोन्यात तेजी आली आहे.
हे वाचा-ऑगस्ट महिन्यात बँकांना आहेत बंपर सुट्ट्या, 15 दिवस आहेत Bank Holidays
रत्न आणि सोन्याचे दागिन्यांची एकूण निर्यात जून महिन्यात 92.37 टक्क्यांपर्यंत वाढून 20,851.28 कोटी झाली आहे. Gems & Jewelery Export Promotion Council च्या मते, गेल्यावर्षी या कालावधीत रत्न आणि सोन्याचे दागिन्यांची एकूण निर्यात 10,838.93 कोटी होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today