मराठी बातम्या /बातम्या /मनी /

एफडीवर SBI, HDFC Bank आणि ICICI Bank पैकी कोण देतंय चांगलं व्याज? तपासा इथे

एफडीवर SBI, HDFC Bank आणि ICICI Bank पैकी कोण देतंय चांगलं व्याज? तपासा इथे

Fixed deposit

Fixed deposit

देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियासह (SBI) खाजगी क्षेत्रातील अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizens) स्‍पेशल फिक्‍स्‍ड डिपॉझिटवर चांगले व्याज देत आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 30 जुलै: कोरोनाच्या संकटकाळात अधिकतर गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी चांगल्या पर्यायाच्या शोधात आहे. यापैकी बरेचजण कमी जोखीम (Low Risk)आणि अधिक रिटर्न (Return) देणाऱ्या पर्यायांना पसंती देतात. अशावेळी फिक्स्ड डिपॉझिट (Bank Fixed Deposit) हा अनेकांच्या आवडीचा पर्याय आहे. मात्र गेल्या काही काळापासून बँकांनी व्याजदरात कपात केली आहे, असे असले तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या एफडीवर बहुतांश बँका चांगलं व्याज देतात. देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियासह (SBI) खाजगी क्षेत्रातील अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizens) स्‍पेशल फिक्‍स्‍ड डिपॉझिटवर चांगले व्याज देत आहेत.

एसबीआयसह या बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि एचडीएफसी बँकेचा (HDFC Bank) समावेश आहे.

तपासा स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्याज दर

एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी गेल्यावर्षी मे महिन्यात एसबीआय वीकेअर (SBI WECARE) ही टर्म डिपॉझिट स्कीम घोषित केली होती. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना पाच ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 0.80 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. सध्या पाच वर्षांसाठी 5.40 टक्के व्याज मिळते आहे, मात्र या स्कीमअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांसाठी 6.20 टक्के दराने व्याज मिळेल.

'या' सहकारी बँकेचा परवाना RBI ने केला रद्द,ठेवीदांराच्या रकमेवर काय होणार परिणाम

HDFC बँके सीनिअर सिटीझन केअर एफडी

एचडीएफसी बँक सीनिअर सिटीझन्ससाठी सीनिअर केअर एफडी नावाने योजना सुरू केली आहे. या एफडीवर बँक 0.25 टक्के अतिरिक्त प्रीमियम ऑफर करत आहे. ज्येष्ठ नागरिकांना जे 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळते त्याशिवाय अधिक 0.25 टक्के व्याज मिळेल. ही स्कीम पाच वर्ष ते दहा वर्षासाठी आहे. एचडीएफसी बँक ज्येष्ठ नागरिकांना 6.25 टक्के दराने व्याज मिळते.

बँक ऑफ बडोदामधील व्याजदर

बँक ऑफ बडोदाने देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी खास स्कीम आणली आहे. पाच वर्षांपेक्षा जास्त ते दहा वर्षांसाठी असणाऱ्या एफडीवर BOB ज्येष्ठ नागरिकांना एक टक्का अधिक व्याज देते आहे. या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 6.25 या दराने व्याज दिले जात आहे.

First published:

Tags: Fixed Deposit, Sbi fd rates