नवी दिल्ली 29 जून : भारतात बहुतांश लोकांना कमी जोखीम असलेले आणि जास्त परतावा (Low Risk & High Returns) देणारे गुंतवणूक पर्याय हवे असतात. त्यामुळे बहुतांश छोटे गुंतवणूकदार सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लानअंतर्गत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. ज्या व्यक्ती शेअर बाजारात (Share Market) एकरकमी किंवा थेट गुंतवणूक करू शकत नाहीत किंवा त्यांना अशा पद्धतीने गुंतवणूक करायची नसते, त्यांच्यासाठी एसआयपी (SIP) हा चांगला मार्ग असतो. एसआयपीमध्ये गुंतवणुकीचा कालावधी दीर्घ असल्यास जास्त परतावा (Return) मिळण्याची शक्यता अधिक असते. शेअर बाजारात अशा अनेक एसआयपी योजना (SIP Schemes) आहेत, की ज्यात गुंतवणूकदार 100 ते 500 रुपयांपासूनही आपली गुंतवणूक सुरू करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा तीन एसआयपी योजनांबद्दल माहिती देत आहोत, की ज्यातून गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळाला.
शेअर बाजारात अशा अनेक म्युच्युअल फंड (Mutual Fund) योजना आहेत, की ज्यात गेल्या पाच वर्षांत वार्षिक 15 टक्के ते 25 टक्क्यांपर्यंतच्या दराने परतावा मिळाला आहे. व्हॅल्यू रिसर्च रिपोर्टनुसार, सर्वांत उत्तम परतावा देण्याच्या बाबतीत PGIM इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटी फंड, कोटक स्मॉलकॅप फंड आणि मिरे असेट्स इमर्जिंग ब्लूचिप हे तीन फंड्स आघाडीवर आहेत. या तीन फंडांच्या मागच्या पाच वर्षांतल्या कामगिरीविषयी जाणून घेऊया.
SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवसात होणार मोठा बदल
1. PGIM इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटी फंडाने (PGIM India Midcap Opportunity fund) गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांत 25 टक्क्यांहून जास्त दराने परतावा दिला आहे. पाच वर्षांत दर महिन्याला पाच हजार रुपये गुंतवल्यावर एकूण गुंतवणूक रक्कम झाली तीन लाख रुपये. पाच वर्षांत त्या रकमेचं मूल्य झालं 11 लाख रुपये. म्हणजे या फंडात गुंतवणूक केल्यावर पाच वर्षांत तीन लाखांचे 11 लाख रुपये झाले. या फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करायची असेल, तर कमीत कमी एक हजार रुपयांची करता येऊ शकते.
2. कोटक स्मॉलकॅप फंडाने (Kotak Smallcap fund ) गेल्या पाच वर्षांत 23 टक्क्यांहून जास्त दराने परतावा दिला आहे. दर महिन्याला पाच हजार रुपये पाच वर्षं या फंडात गुंतवल्यावर गुंतवणुकीची रक्कम तीन लाख रुपये झाली. पाच वर्षांनी त्यातून 10.54 लाख रुपये मिळाले. या फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करायची असेल, तर कमीत कमी एक हजार रुपयांपासून सुरुवात करता येते.
EPFO: आता या कर्मचाऱ्यांची Take Home सॅलरी वाढणार, वाचा कुणाला मिळेल फायदा?
3. मिरे असेट्स इमर्जिंग ब्लूचिप फंडाने (mirae asset emerging bluechip fund) गेल्या पाच वर्षांत 23 टक्के दराने परतावा दिला आहे. पाच वर्षं दर महिन्याला पाच हजार रुपये म्हणजे एकूण तीन लाख रुपये गुंतवल्यावर यातून 10.47 लाख रुपये मिळाले .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Savings and investments