• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price Today: दोन दिवसांच्या वाढीनंतर आज सोने दरात घसरण, चांदीचा भावही उतरला

Gold Price Today: दोन दिवसांच्या वाढीनंतर आज सोने दरात घसरण, चांदीचा भावही उतरला

भारतीय सराफा बाजारात फेस्टिव्ह सीजनदरम्यान सोने दरात दोन दिवसाच्या वाढीसह (Gold Price Today) आज 29 ऑक्टोबर 2021 रोजी पुन्हा घसरण झाली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : भारतीय सराफा बाजारात फेस्टिव्ह सीजनदरम्यान सोने दरात दोन दिवसाच्या वाढीसह (Gold Price Today) आज 29 ऑक्टोबर 2021 रोजी पुन्हा घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं प्रति 10 ग्रॅम 47 हजारहून कमी झालं आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही (Silver Price Today) घसरण झाली आहे. मागील सत्रात सोनं दिल्ली सराफा बाजारात 47,158 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव 63,897 रुपये प्रति किलोग्रॅवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने दरात कमी आली आहे. तर चांदीचा दरही कमी झाला आहे. सोन्याचा आजचा भाव - दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोने दरात 271 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव 47 हजारांहून कमी झाला असून 46,887 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.

    तुमच्या गाडीचा FASTAG जुना तर झाला नाही? पडू शकतो मोठा भुर्दंड

    चांदीचा आजचा भाव - चांदीच्या दरातही आज मोठी घसरण झाली. दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी चांदीच्या दरात 687 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे शुक्रवारी चांदीचा दर 63,210 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला. सणासुदीच्या काळात सोनं आपल्या रेकॉर्ड स्तरावरुन 9313 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोने दर 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता.

    Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल दरात वाढ कायम, तपासा तुमच्या शहरातील रेट

    सोने दरात घसरण का? एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Security) सीनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचे दर डॉलरच्या मजबूतीमुळे आणि आंतरराष्ट्रीय संकेतांमुळे दबावात आहेत. त्यामुळे भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मिळालेल्या घसरणीच्या संकेतांमुळेही गोल्ड दरात घसरण झाली आहे.
    Published by:Karishma
    First published: