• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल दरात वाढ कायम, तपासा तुमच्या शहरातील रेट

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल दरात वाढ कायम, तपासा तुमच्या शहरातील रेट

सरकारी तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) शुक्रवारी पेट्रोल-डिझेल दरात वाढ (Petrol Diesel hike) केली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : सरकारी तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) शुक्रवारी पेट्रोल-डिझेल दरात वाढ (Petrol Diesel hike) केली आहे. पेट्रोल दरात सततच्या वाढीने राष्ट्रीय राजधानी दिल्लीत दर 108 रुपयांवर गेला आहे. तर डिझेल 97 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल आणि डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर इंधन दर जवळपास दुप्पट होतो. चार महानगरात पेट्रोल डिझेल दर (Petrol Diesel Price on 29 October 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 108.64 रुपये आणि डिझेल 97.37 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 114.47 रुपये आणि डिझेल 105.49 रुपये प्रति लीटर >> चेन्नईत पेट्रोल 105.43 रुपये आणि डिझेल 101.59 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 109.12 रुपये आणि डिझेल 100.49 रुपये प्रति लीटर असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

    Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलची मूळ किंमत किती? केंद्र आणि राज्य सरकार किती कर आकारतात?

    गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल-डिझेलचे दर ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना (Oil Companies) देण्यात आला आहे. त्यामुळे तेल कंपन्या दररोज इंधनाचे दर जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती वाढलेल्या असल्याने इंधन दरात वाढ होतेय. त्याचप्रमाणे डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन असलेल्या रुपयाचं मूल्य कमी-जास्त होण्यावरही पेट्रोल-डिझेलच्या किमती अवलंबून असतात. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारकडून लावला जाणारा कर, मालवाहतूक, डीलर शुल्क आणि डीलर कमिशन यांचाही समावेश पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होतो. या सगळ्यामुळे इंधनाच्या किमतीत मोठी वाढ होते. सध्या पेट्रोल पंपांवर पेट्रोलची किंमत लिटरला 110 ते 112 रुपयांच्या आसपास आहे; पण पेट्रोलची मूळ किंमत 44 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा मूळ दरही 45 ते 46 रुपयांच्या आसपास आहे. कर आणि इतर शुल्क समाविष्ट केल्यानंतर त्याची किंमत 95 रुपयांच्या पुढे गेली आहे. यावरून आपण राज्य आणि केंद्र सरकारला कर रूपाने, तसंच अन्य शुल्काच्या (Charges) रूपात किती पैसे देतो ते लक्षात येईल.
    Published by:Karishma
    First published: