• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • तुमच्या गाडीचा FASTAG जुना तर झाला नाही? पडू शकतो मोठा भुर्दंड

तुमच्या गाडीचा FASTAG जुना तर झाला नाही? पडू शकतो मोठा भुर्दंड

तुमच्या गाडीला लावलेला (Check expiry date of Fastag and change it on time) फास्टॅग जुना झाला आणि तरीही तुम्ही तो वापरत राहिला, तर तुम्हाला मोठा भुर्दंड पडण्याची शक्यता आहे.

 • Share this:
  मुंबई, 29 ऑक्टोबर : तुमच्या गाडीला लावलेला (Check expiry date of Fastag and change it on time) फास्टॅग जुना झाला आणि तरीही तुम्ही तो वापरत राहिला, तर तुम्हाला मोठा भुर्दंड पडण्याची शक्यता आहे. टोल नाक्यावरील गर्दी कमी करून वाहतुकीचा वेग वाढवण्याच्या हेतून (Concept of Fastag) फास्टॅग ही संकल्पना भारतात राबवण्यात येत आहे. या संकल्पनेची अंमलबजावणी ही उत्तमरित्या सुरू असली तरी आपल्या फास्टॅगच्या मुदतीवर (Expiry of Fastag) लक्ष ठेवण्याची गरज आहे. अन्यथा, सुविधेऐवजी मोठा भुर्दंडच पडण्याची शक्यता आहे. रस्ते विभागानं निश्चित केलीय मुदत फास्टॅग विकत घेतल्यानंतर तो किती काळ लागू राहिल, याची एक ठराविक मुदत केंद्रीय रस्ते वाहतूक विभागानं निश्चित केली आहे. त्यापूर्वी फास्टॅग मिळवण्यासाठीदेखील एक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. वैध फास्टॅगचा वापर सुरू केल्यानंतर जेव्हा तो एक्सपायर होईल, त्यावेळी मात्र अशा वाहनाला विना फास्टॅग असल्याचं मानण्यात येईल आणि मोठा भुर्दंड पडेल. त्यामुळे वेळीच आपल्या फास्टॅगची मुदत तपासणे आणि ती संपल्यानंतर ताबडतोब फास्टॅग बदलून घेणे, गरजेचे आहे. पाच वर्षांची मुदत कुठल्याही फास्टॅगसाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक विभागानं 5 वर्षांची मुदत निश्चित केली आहे. पाच वर्षांनंतर हा फास्टॅग एक्सपायर होईल, म्हणजेच त्याची वैधता संपेल. त्यानंतर नवा फास्टॅग न लावता तुम्ही टोल नाक्यावर गेलात, तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागू शकतो. शिवाय तुमचा वेळदेखील वाया जाऊ शकतो. हे वाचा- पोलीस स्टेशनपासून अवघ्या 200 मीटरवर तरुणाची हत्या, डोक्यात वार करुन संपवलं निर्णयामागे तांत्रिक कारणं केंद्र सरकारनं फास्टॅगची मुदत 5 वर्षंच का ठेवली, यामागे काही कारणं आहेत. प्रत्येक फास्टॅगमध्ये एक छोटी चिप असते. ही चिप सहसा खराब होत नाही. मात्र काहीवेळा पाच वर्षांच्या वापराने तिच्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. काही फास्टॅगच्या चिपमध्ये तांत्रिक बिघाड होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने पाच वर्षानंतर आपला जुना फास्टॅग बदलून नवा लावावा, अशी सूचना रस्ते विभागानं केली आहे.
  Published by:desk news
  First published: