मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, तपासा 10 ग्रॅमचा नवा भाव

Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, तपासा 10 ग्रॅमचा नवा भाव

भारतीय सराफा बाजारात आज 15 डिसेंबर 2021 रोजी सोने दरात घसरण (Gold Price Today 15 December 2021) पाहायला मिळाली. घसरणीची नोंद झाली तरी सोने दर 47000 रुपयांवर कायम आहे.

भारतीय सराफा बाजारात आज 15 डिसेंबर 2021 रोजी सोने दरात घसरण (Gold Price Today 15 December 2021) पाहायला मिळाली. घसरणीची नोंद झाली तरी सोने दर 47000 रुपयांवर कायम आहे.

भारतीय सराफा बाजारात आज 15 डिसेंबर 2021 रोजी सोने दरात घसरण (Gold Price Today 15 December 2021) पाहायला मिळाली. घसरणीची नोंद झाली तरी सोने दर 47000 रुपयांवर कायम आहे.

नवी दिल्ली, 15 डिसेंबर : भारतीय सराफा बाजारात आज 15 डिसेंबर 2021 रोजी सोने दरात घसरण (Gold Price Today 15 December 2021) पाहायला मिळाली. घसरणीची नोंद झाली तरी सोने दर 47000 रुपयांवर कायम आहे. चांदीच्या दरातही (Silver price Today 14 December 2021) आज घसरण झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सोने दरात 297 रुपयांच्या घसरणीची नोंद झाली. तर चांदीच्या दरात 556 रुपयांची कमी आली आहे.

काय आहे आजचा सोन्याचा दर?

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोने दर 297 रुपयांच्या घसरणीसह 47,019 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने दर 47,316 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.

चांदीचा आजचा भाव -

चांदीच्या दरातही आज घसरणीची नोंद झाली. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीच्या दरात 556 रुपयांच्या घसरणीसह चांदीचा भाव 59,569 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात चांदीचा भाव 60,125 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सोने दर आपल्या ऑल टाइम हाय रेटवर पोहोचला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सराफा बाजारात सोन्याचा भाव 55,400 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. आज सोनं रेकॉर्ड स्तरावरुन जवळपास 8500 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

22रुपयांचा हा शेअर एका वर्षात झाला 354रुपये,1 लाखाचे झाले 16 लाखांहून अधिक रुपये

सोने दरात घसरण का?

एचडीएफसी सिक्योरिटीचे (HDFC Security) सीनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी बुधवारी कॉमेक्सवर Spot Gold Prices कमी होऊन 1,769 अमेरिकी डॉलर प्रति औंस झाल्याचं सांगितलं. यूएस एसएमसी मीटिंग बैठकीच्या निकालापूर्वी सोन्याच्या किमतीवर दबाव असल्याचंही ते म्हणाले.

PF Balance: पीएफ बॅलन्स तपासणं झालं सोपं, मिस्ड कॉल देऊनही होईल काम

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर

तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

First published:
top videos

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today