मुंबई, 06 डिसेंबर: गेल्या एक ते तीन वर्षांत तंत्रज्ञानावर आधारित म्युच्युअल फंड्स (Technology Mutual funds) योजनांनी भरघोस रिटर्न्स दिले आहेत. टेक्नॉलॉजी फंड्समध्ये (Technology Funds Return) गुंतवणूक करणाऱ्या काही गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स मिळाले आहेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार या फंड्सकडे वळले आहेत. अशी स्थिती असली तरी, इनव्हेस्टमेंट एक्सपर्ट्स (Investment Experts) कोणत्याही थीमॅटिक किंवा सेक्टोरल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करत नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी बोलल्यानंतरच टेक्नॉलॉजी फंड्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. टेक्नॉलॉजी फंड्समधील रिटर्न टेक्नॉलॉजी म्युच्युअल फंड योजनांनी गेल्या वर्षभरात 95 टक्क्यापर्यंत तर, तीन वर्षांत 45 टक्के आणि पाच वर्षांत 35 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स दिले आहेत. जर तुम्ही एका वर्षापूर्वी एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंडामध्ये (SBI Technology Opportunities Fund) 1 लाख रुपये गुंतवले असते, तर तुम्हाला 1 लाख 82 हजार रुपये मिळाले असते. याशिवाय 10 हजार रुपयांच्या मासिक एसआयपीमधून (SIP) 1 लाख 64 हजार रुपये मिळाले असते. याच योजनेत तीन वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्यातून आत्ता 2 लाख 65 हजार रुपये मिळाले असते. तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मंथली एसआयपीतून आत्ता 7 लाख 44 हजार रूपये रिटर्न मिळाला असता. हे वाचा- कोरोना काळातही कृषी आणि प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीत 13 टक्क्यांनी वाढ एक्सपेन्स रेशो (Expense ratio) टेक्नॉलॉजी फंडचे रेग्युलर प्लॅन 2 ते 2.46 टक्के शुल्क आकारतात. जर तुम्ही डायरेक्ट ऑप्शनचा वापर केला तर कमी (0.5 ते 1 टक्के) एक्सपेन्स रेशो लागतो. तज्ज्ञ काय म्हणतात ? कोणत्याही गुंतवणूकदारानं आपल्या गुंतवणूक योजना (Investment Scheme) निवडण्यापूर्वी काही मूलभूत गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. भरमसाठ योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा कमी पण दर्जेदार योजनांचा पोर्टफोलिओमध्ये समावेश करणं कधीही चांगलं. अनेक स्कीममध्ये एकूण रिटर्न्स कमी मिळतात. त्यामुळे तुमची उद्दिष्टे आणि जोखीम लक्षात घेऊन स्कीम निवडावी. तुमचं रिस्क-प्रोफाइल (Risk-profile) समजून घ्या. जर तुम्ही जास्त जोखीम घेऊ शकत नसाल तर फ्लेक्सी कॅप फंडामध्ये गुंतवणूक करा. रिस्क फॅक्टर कमी करण्यासाठी तुम्ही लार्ज कॅप फंड (Large Cap Fund) देखील निवडू शकता. हे वाचा- Edelweiss Securities ची ‘या’ सरकारी कंपनीचा शेअर खरेदीची शिफारस गुंतवणूकदारांनी काय करावे ? नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार (Registered investment advisor) नवीन आणि नियमित गुंतवणूकदारांना थीमॅटिक किंवा सेक्टोरल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाहीत. ज्या व्यक्तींना या क्षेत्रात प्रवेश करणं व बाहेर पडणं सहज शक्य आहे आणि ज्यांना या क्षेत्रातील चढ-उतारांची चांगली माहिती आहे, केवळ त्यांनीच अशा स्कीममध्ये गुंतवणूक केली पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, नियमित गुंतवणूकदारानं फ्लेक्सी कॅप स्कीम घ्यावी. सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार करून काळजीपूर्वक गुंतवणूक केल्यास त्यातून निश्चितपणे चांगले रिटर्न्स मिळतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.