लवकरच या 600 ट्रेन्समधून प्रवास करता येणार नाही, मोठे बदल होण्याची शक्यता

लवकरच या 600 ट्रेन्समधून प्रवास करता येणार नाही, मोठे बदल होण्याची शक्यता

भारतीय रेल्वे झिरो-बेस्ड टाइमटेबल (Zero-based Time table) जारी करणार आहे. सध्या या निर्णयाबाबत काम सुरू आहे आणि लवकरचं याबाबत नोटिफिकेशन जारी केले जाणार आहे. नवीन वेळापत्रकात अनेक बदल केले जाणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर: सर्व पॅसेंजर ट्रेनसाठी (Passenger Trains) भारतीय रेल्वेकडून लागू होणाऱ्या झिरो-बेस्ड टाइमटेबल (Zero-based Time table) मध्ये काही महत्वाच्या बाबी असणार आहेत. येणाऱ्या काळात लवकरचं याबाबत नोटिफिकेशन जारी केले जाणार आहे. यामध्ये अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे की, या नवीन वेळापत्रकानुसार एकूण 600 मेल/एक्स्प्रेस रद्द केल्या जाऊ शकतात. रेल्वेच्या योजनेनुसार 10,200 हॉल्ट्स देखील संपुष्टात आणले जातील, तसेच 360 पॅसेंजर ट्रेन्सना. मेल किंवा एक्स्प्रेसमध्ये कन्व्हर्ट केले जाईल. त्याचप्रमाणे 120 मेल/एक्स्प्रेस ट्रेन्सना सुपरफास्ट ट्रेन्सच्या श्रेणीमध्ये अपग्रेड केले जाईल. एका मीडिया अहवालात सूत्रांच्या हवल्याने असे सांगण्यात आले आहे की, सध्या रेल्वेकडून या निर्णयाबाबत काम सुरू आहे आणि लवकरचं याबाबत नोटिफिकेशन जारी केले जाणार आहे.

गुरुवारी रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव (V K Yadav) यांनी असे म्हटले की, संपूर्ण रेल्वेचे परिचालन पुन्हा सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर नवीन नियम लागू केले जातील. त्यांनी असे म्हटले की, 'सध्या कोव्हिड-19 ची परिस्थिती पाहता मी एक निश्चित वेळ सांगू शकत नाही. हे या गोष्टीवर अवलंबून असेल की आपण सामान्य सेवा कधीपासून सुरू करू.'

'टाइम स्लॉट'बाबत आयआयटी मुंबईची मदत

याआधी देखील काही मीडिया अहवालानुसार असे सांगण्यात आले आहे की, नवीन प्रणालीमध्ये पॅसेंजर ट्रेन्सबरोबरच रेल्वेच्या थांब्याची संख्या देखील कमी केली जाणार आहे. रेल्वेद्वारे करण्यात येणाऱ्या या बदलाचा अर्थ असा आहे की सर्व पॅसेंजर ट्रेन्सचे टाइमटेबल पुन्हा नवीन प्रकारे तयार केले जात आहे. रेल्वेकडून अशीही माहिती देण्यात आली आहे की, याकरता आयआयटी मुंबईची मदत घेतली जात आहे. या अंतर्गत मालवाहू ट्रेन्स आणि मेंटेनन्ससाठी वेगळे टाइम स्लॉट देण्यात येणार आहेत.

रात्री उशीरापर्यंत थांबे न ठेवण्याचा प्रयत्न

रेल्वेच्या या नव्या पुढाकाराने देशातील सर्वात मोठ्या परिवहन सेवेला आर्थिक फायदा होईल आणि खर्चही कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अलिकडच्या काळात रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. रेल्वे आपला महसूल वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. सूत्रांनी असेही सांगितले आहे की झिरो-बेस्ड वेळापत्रकांमध्ये रात्री उशीरा गैरसोयीच्या वेळेस गाड्यांचे थांबे असणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्वाचे निर्णय रेल्वे घेत आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 16, 2020, 3:30 PM IST

ताज्या बातम्या