जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Godrej Properties च्या बोर्डाने DB Realty मधील गुंतवणूक योजना नाकारली, शेअरमधील पडझड थांबेल?

Godrej Properties च्या बोर्डाने DB Realty मधील गुंतवणूक योजना नाकारली, शेअरमधील पडझड थांबेल?

Godrej Properties च्या बोर्डाने DB Realty मधील गुंतवणूक योजना नाकारली, शेअरमधील पडझड थांबेल?

गोदरेज प्रॉपर्टीजने डीबी रियल्टीमधील 10 टक्के स्टेक घेण्यासाठी 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. याशिवाय मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास (Slum Rehabilitation) प्रकल्पासाठी संयुक्त उपक्रम तयार करण्यात येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 फेब्रुवारी : मुंबईतील रिअल इस्टेट फर्म गोदरेज प्रॉपर्टीजने (Godrej Properties) 4 फेब्रुवारी रोजी माहिती दिली की त्यांच्या बोर्डाने डीबी रियल्टीमध्ये (DB Realty) 400 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सुमारे 10 टक्के भागभांडवल विकत घेण्याची पूर्वीची घोषणा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. भागधारक आणि गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांनंतर बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सविस्तर चर्चा, भागधारक आणि अल्पसंख्याक गुंतवणूकदारांकडून मिळालेला अभिप्राय लक्षात घेऊन, कंपनीच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे की गोदरेज प्रॉपर्टीज यापुढे संभाव्य गुंतवणुकीवर कोणतेही पाऊल उचलणार नाही. कंपनी प्रत्येक प्रकरणाच्या आधारावर डीबी रियल्टीसह वेगवेगळ्या प्रकल्पांवर संयुक्तपणे काम करण्याच्या शक्यतांचा शोध घेणे सुरू ठेवेल. Tax Saving साठी उत्तम पर्याय आहे ELSS, तुमच्या गंतवणुकीवर किती फायदा मिळेल? गोदरेज प्रॉपर्टीजने डीबी रियल्टीमधील 10 टक्के स्टेक घेण्यासाठी 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. याशिवाय मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास (Slum Rehabilitation) प्रकल्पासाठी संयुक्त उपक्रम तयार करण्यात येणार आहे. मार्केटला कंपनीचा हा प्लान आवडला नसावा, त्यामुळे 2 दिवस स्टॉकमध्ये मोठी घसरण होत आहे. गोदरेज प्रॉपर्टीजच्या शेअर्समधील घसरण ४ फेब्रुवारी रोजी विस्तारताना दिसून आली. काल स्टॉक आणखी 10 टक्क्यांनी घसरला होता. गोदरेज प्रॉपर्टीजने विश्लेषकांशी केलेल्या संभाषणात सांगितले होते की, या भागीदारीमुळे कंपनीला मुंबईतील पुनर्विकास व्यवसायात मोठ्या संधी मिळण्याची शक्यता आहे. या संयुक्त उपक्रम करारांतर्गत, डीबी रियल्टी व्यवसाय विकासाची देखरेख करेल आणि प्रकल्पाची बाजू मंजुरीसाठी तयार करेल. त्याचबरोबर विकास, विक्री आणि मार्केटिंगचे काम गोदरेज प्रॉपर्टीज करणार आहे. पण आता बाजारातून नकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने गोदरेज प्रॉपर्टीजने या योजनेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार भांडवली वाटपाचा किचकट निर्णय मानला जात असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. कारण झोपडपट्टी पुनर्वसन योजनांशी संबंधित विविध धोके आहेत. Post Office Monthly Income Scheme: पोस्ट ऑफिसची ही स्कीम मिळवून देईल दरमहा उत्पन्न; मिळेल BEST रिटर्न ब्रोकरेज फर्म CLSA चे म्हणणे आहे की झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचे प्रकल्प नियम आणि नियमांच्या जाळ्यात अडकतात, त्यामुळे हा करार बाजाराला पसंत पडत नाही. CLSA ने स्टॉकवर विक्रीचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे, ब्रोकरेज फर्म जेफरीजचे म्हणणे आहे की डीबी रियल्टी आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पावर कंपनीचा निर्णय नजीकच्या काळात स्टॉकसाठी चांगला नाही. जेफरीजने स्टॉकवर खरेदीचा कॉल कायम ठेवला असला तरी, तिने आपल्या किमतीचे टार्गेट 27 टक्क्यांनी कमी केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात