मुंबई, 5 फेब्रुवारी : तुम्ही करदाते (Tax Payer) असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची आणि उपयुक्त बातमी आहे. आता सर्वांना माहीत आहे की, बहुतेक करदाते कर बचतीसाठी (Tax Saving) अनेक पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंड योजनांमध्ये (Mutual Fund Scheme) इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम म्हणजेच ELSS (Equity Linked Saving Scheme) हा यातील सर्वोत्तम पर्याय मानला जातो. ELSS गुंतवणूक रक्कम इक्विटी मार्केटमध्ये गुंतवली जाते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ELSS म्हणजे काय? ELSS ही एक इक्विटी म्युच्युअल फंड श्रेणी आहे, ज्यामध्ये गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट उपलब्ध आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे याचा लॉक-इन कालावधी फक्त 3 वर्षांचा आहे. बरेच लोक ELSS ला टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड योजना म्हणून देखील संबोधतात. ELSS मध्ये गुंतवणूक करून, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करू शकते. लॉक-इन कालावधी संपल्यानंतरही तुम्ही गुंतवणूक सुरू ठेवू शकता तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी संपल्यानंतर गुंतवणूकदार इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम सुरू ठेवू शकतो. ELSS मध्ये गुंतवणूक फंड हाऊस किंवा म्युच्युअल फंड वितरकांमार्फत करता येते. स्वत:हून निर्णय घेण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ELSS मध्ये गुंतवणूक कशी करावी? ELSS मध्ये गुंतवणूक करण्यासाठी KYC आवश्यक आहे. तुम्हाला चेकसह ब्रांच ऑफिस किंवा फंड हाउसच्या रजिस्ट्रार कार्यालयात फॉर्म भरावा लागेल. फंड हाऊसच्या वेबसाइटद्वारे किंवा एग्रीगेटर्सद्वारे कोणीही ELSS मध्ये ऑनलाइन गुंतवणूक करू शकते. जेव्हा तुम्ही ELSS मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला एक फोलिओ क्रमांक मिळतो. हा पोर्टफोलिओ क्रमांक देऊन भविष्यात ELSS योजनेत गुंतवणूक करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.