मुंबई, 05 फेब्रुवारी: जर तुम्ही सुरक्षित गुंतवणूक (Saving and Investment) आणि निश्चित उत्पन्नासाठी चांगला गुंतवणूक पर्याय (investment option) शोधत असाल, तर पोस्ट ऑफिस (Post Office Saving Scheme) मंथली इन्कम स्कीम (Post Office Monthly Income Scheme) तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते. येथे गुंतवणूक करताना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. तसंच निश्चित उत्पन्न आहे. पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीमच्या नावावरून तुम्ही समजू शकता की, ही एक मासिक उत्पन्न योजना आहे. या योजनेद्वारे, तुम्ही तुमचे पैसे पूर्ण हमीसह व व्याजासह परत मिळवू शकता. …तर प्रत्येक महिन्याला मिळतील पैसे पोस्ट ऑफिसच्या या योजनेत वार्षिक 6.6 टक्के व्याज मिळतं. योजनेचा मुदत कालावधी 5 वर्षे आहे. म्हणजेच 5 वर्षांनंतर तुम्हाला मासिक उत्पन्नाची हमी मिळू लागेल. जर तुम्ही एकरकमी 4.5 लाख रुपये जमा केले तर 5 वर्षांनंतर तुम्हाला दरवर्षी 29,700 रुपये मिळतील. जर तुम्हाला दर महिन्याला उत्पन्न हवे असेल, तर तुम्हाला दरमहा 2475 रुपये मिळतील. हे वाचा- Gold Price Today: काय आहे मुंबई-पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव, तपासा लेटेस्ट रेट 1000 रुपयांमध्ये उघडेल अकाउंट पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत फक्त 1000 रुपयांमध्ये अकाउंट उघडता येते. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती हे अकाउंट उघडू शकते. एक व्यक्ती एकावेळी जास्तीत जास्त 3 खातेदारांसह अकाउंट उघडू शकते. या अटी लक्षात ठेवा या योजनेअंतर्गत अकाउंट उघडण्यासाठी एक अट अशी आहे की, तुम्ही 1 वर्ष पूर्ण होण्याआधी तुमची ठेव काढू शकत नाही. तसंच तुम्ही योजनेचा मुदत कालावधी पूर्ण होण्यापूर्वी म्हणजे 3 ते 5 वर्षांदरम्यान पैसे काढलेत, तर मूळ रक्कमेपकी 1 टक्का रक्कम वजा करून तुम्हाला पैसे दिले जातील. दुसरीकडे, जर तुम्ही योजनेचा मुदत कालावधी पूर्ण झाल्यावर पैसे काढले, तर तुम्हाला या योजनेचे सर्व फायदे मिळतील. हे वाचा- Paytm Q3 Result: पेटीएमचा तोटा वाढला; मात्र महसुलात 89 टक्क्यांची वाढ सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी अनेक योजनांवर चांगले रिटर्न मिळण्याचा दावा केला जात आहे. परंतु त्यांच्यापैकी काहींमध्ये जोखीम दर खूप जास्त आहेत. अनेक गुंतवणूकदार कमी फायदा पण सुरक्षित गुंतवणूक योजनांना प्राधान्य देतात. कारण त्यामध्ये कमी धोका असतो. काही गुंतवणूक योजनांमध्ये मात्र चांगले रिटर्न मिळण्याबरोबरच जोखीमही कमी असते. तुम्हीही अशा गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.