आता प्रत्येक कामासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, SBI सह अनेक बँका ATM वर देणार 10 फ्री सेवा

आता प्रत्येक कामासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, SBI सह अनेक बँका ATM वर देणार 10 फ्री सेवा

आत्तापर्यंत तुम्ही कोणत्याही बँकेच्या ATMsचा वापर पैसे काढण्यासाठी अथवा तुमच्या खात्यावरील बॅलेंस तपासण्यासाठी केला असेल. मात्र आता तुम्हाला ATMमधून इतर अनेक कामे करता येणार आहे. एफडीपासून ते टॅक्स डिपॉझिटपर्यंत अशी अनेक कामे तुम्हाला ATMsच्या माध्यमातून करता येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जानेवारी: आता तुमचं ATM फक्त पैसे काढणे आणि बॅलेंस चेक करण्यापर्यंतच मर्यादीत राहणार नाही.  तुमच्या ATM चा वापर इतर अनेक कामे  करण्यासाठी करता येणार आहे. अनेक महत्त्वाची कामे तुम्हाला तुमच्या एटीएममधून करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही.  ज्या कामांसाठी बँकेच्या शाखेत जावून तुम्हाला तासनतास रांगेत उभं राहवं लागतं होतं. ते काम आता तुमच्या ATMsमधून काही मिनिटात होणार आहे.  एफडीपासून ते टॅक्सचे पैसे डिपॉझिट करण्यापर्यंतच्या अशा 10 सुविधा तुमच्या ATMsवर उपलब्ध होणार आहे.

( 1) टॅक्स भरणा

तुम्ही आत्तापर्यंत तुमचा टॅक्स  इनकम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवरून भरला असेल.  किंवा थर्ट पार्टी वेबसाईटवरून भरणा केला असेल. मात्र आता तुम्हाल तुमचा आयकर ATMच्या माध्यमातून भरता येणार आहे. तुम्ही तुमचा ऍडव्हान्स टॅक्स, सेल्फ असेसमेंट, रेग्युलर असेसमेंट नंतर देण्यात येणारा टॅक्स ATMमधून भरता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला आधी वेबसाईट ब्रांचमध्ये स्वत:जावून नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ATMच्या माध्यमातून टॅक्स भरता येईल. तुमच्या खात्यातून टॅक्सचे पैसे कट झाल्यानंतर एक CIN नंबर येईल.  टॅक्स जमा झाल्यानं 24 तासात वेबसाइटमधून CIN च्यामाध्यमातून चलान प्रिंट केले जाऊ शकते.

(2) FD काढता येणार

तुम्हाला बँकेची एफडी काढण्यासाठी शाखेत जावं लागत होतं. मात्र आता तुम्हाला एटीएमच्या माध्यमतून एफडी काढता येणार आहे. एटीएमच्या माध्यमातून स्क्रीनच्या मेन्यूवर एफडीचे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला एफडी काढता येणार आहे. यातून तुम्हाला किती रक्मेची आणि किती कालावधीसाठी फिक्स डिपॉझिट करायचे याचे ऑप्शन मिळेल. त्यानतंर कन्फर्म केल्यावर तुमची एफडी होईल.

(3) पॉलिसीचा प्रिमियम भरता येणार

एटीएमच्या माध्यमातून इंशोरन्स पॉलिसीचा प्रिमियमही भरता जणार आहे. त्यासाठी सर्वच बँकांनी LIC, HDFC लाईफ, SBI लाईफ सारख्या विमा कंपन्यांशी करार करण्यात आला आहे. या तीन कंपनीच्या पॉलिसीची रक्कम ग्राहक ATMच्या माध्यमातून करू शकतात. ATM वर तुम्हाला बिल पे सेक्शन ऑप्शन येईल. त्यानंतर ज्या कंपनीची पॉलिसी आहे त्या कंपनीचं नाव तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. पॉलिसी नंबर टाकल्यानंतर तुमची जन्म तारीख किंवा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर पॉलिसीच्या प्रिमियमची रक्कम टाकून कन्फर्म केल्यास तुमची पॉलिसी भरली जाईल.

(4)  सहज मिळवता येणार लोन

तुम्हाला आता पर्सनल लोन घेण्यासाठी बँकेच्या शाखेत जावं लागणार नाही. तुमच्या एटीएममधून तुम्हाला पर्सनल लोन मिळणार आहे. एटीएममधून पर्सनल लोनसाठी अप्लाय करता येईल. एटीएमच्या माध्यमातून लोन देण्यासाठी बँक तुमच्या खात्यातील व्यवहार तपासते. तुमच्या खात्यातील बॅलेंस पाहिले जाते. पगाराची रक्कम आणि क्रेडिट/ डेबिड कार्डवरील रीपेमेंटचा रेकॉर्ड तपासला जातो. त्यानंतर तुम्हाला पर्सनल लोन मिळतं.

(5)पैशांचे ट्रान्सफर सहज करता येणार

ATMचा वापर करून एका खात्यातून दुसऱ्यांच्या खात्यात रक्कम सहज जमा करता येणार आहे.  त्यासाठी तुम्हाला  ज्या खात्यात पैसे पाठवायचे आहे त्या खात्याची बँके शाखेत जावून किंवा ऑनलाईन नोंदण करावी लागेल. एटीएममधून एका वेळी 40 हजार रुपये पाठवता येणार आहे. दिवसभरात अनेकदा पैसे पाठवता येईल.

(6) कॅश डिपॉझिट सुविधा

देशभरातील जवळपास सर्वच बँकांनी त्यांच्या एटीएमसोबत कॅश डिपॉझिट मशीन ठेवली आहे. त्या माध्यमातून ग्राहक आपल्या खात्यात पैसे जमा करू शकतात. एका वेळी 49 हजार 900 रुपये जमा करता येतात. मशीनमध्ये 2000, 500, 100, 50 रुपयाच्या नोटा जमा करता येणार आहे.

(7)बिल भरता येणार

एटीएमच्या माध्यमातून तुम्हाला सर्व प्रकारचे बील भरता येणार आहे. टेलीफोन बिल, वीज बिल आणि गॅस बिलासह इतर बिल भरता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला बँकेच्या साईटवर जाऊन एकदा नोंदणी करावी लागेल.

(8) मोबाइल रीचार्ज

आता तुम्हाला तुमचा मोबाईल रिचार्ज सुद्धा एटीएमच्या माध्यमातून करता येणार आहे. कोणत्याही शाखेच्या एटीएममध्ये जावून रिचार्ज ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला तुमच्या प्रिपेड मोबाईल रिचार्ज करता येणार आहे.

(9)  डोनेशन देता येणार

तुम्हाला जर कोणत्याही मंदिराला आणि संस्थेताल दान करायचं असेल तर तेही एटीएमच्या माध्यमातून करता येणार आहे.  SBIच्या एटीएममधून तुम्हाला अनेक देवस्थानाला दान देता येणार आहे. तशी सुविधाचं ATMमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

(10) चेक बुक विनंती

तुम्हाला आता चेक बुकसाठी रिक्वेस्ट पाठवण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. तुमच्या एटीएममध्ये चेक बुक रिक्वेस्टचं ऑप्शन आहे. त्या ऑप्शनवर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पत्त्यावर चेक बुक येणार आहे.

पोस्टात खातं असणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पैसे काढताना द्यावा लागणार कर

Published by: Manoj Khandekar
First published: January 12, 2020, 2:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading