Home /News /money /

दुबई पडलं जळगावच्या प्रेमात; वर्षभरात खाल्ली 600 कोटी रुपयांची केळी

दुबई पडलं जळगावच्या प्रेमात; वर्षभरात खाल्ली 600 कोटी रुपयांची केळी

केळ्यांच्या निर्यातीमुळे भारताला बराच फायदा झालेला आहे.

केळ्यांच्या निर्यातीमुळे भारताला बराच फायदा झालेला आहे.

महाराष्ट्राच्या केळ्यांची चव दुबईला (Banana Exported to Dubai) विशेष भावली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यामधल्या केळ्यांना GI मानांकन मिळालं आहे.

    जळगाव, 17 जून : केळ्यांच्या उत्पादनामध्ये जगभराचा भारताचा चांगला दबदबा आहे. भारतात जगाच्या तुलनेत 25 टक्के केळ्यांचं उत्पादन केलं जातं. दरवर्षी मोठ्या प्रमाणात जगभरात केळी निर्यात केली जातात. कोरोनामुळे सगळीकडेच मंदी पसरलेली असली तरी, केळ्यांच्या निर्यातीमुळे भारताला बराच फायदा झालेला आहे. फक्त एकट्या दुबईमध्ये 600 कोटींपेक्षाही अधिक किमतीची केळी निर्यात झालेली आहेत. मात्र एका खास जातीची केळी दुबईमध्ये जास्त प्रसिद्ध आहेत. जळगावी केळी ती केळी आहेत जळगावची. महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील केळ्यांना GI मानांकन मिळालेलं आहे. याच GI मानांकित केळ्यांची 22 मेट्रिक टन निर्यात दुबईला करण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे जळगाव जिल्ह्यातल्या तळवडी गावातल्या एकाच शेतकऱ्याच्या शेतातील ही केळी आहेत. (गंगा नदीत तरंगणाऱ्या पेटीतून येत होता रडण्याचा आवाज; उघडून बघताच बसला धक्का) GI टॅग म्हणजे काय ? GI टॅग म्हणजेच Geographical Indication  असा त्याचा अर्थ आहे. एखाद्या उत्पादनाची भौगोलिक ओळख GI टॅगमुळे होते. जळगावची केळी, दार्जिलिंगचा चहा, चंदेरी साडी, सोलापूरी चादरी, मैसूर सिल्क, भागलपूरी सिल्क, बिकानेरी भुजिया यांना आत्तापर्यंत जीआय टॅग देण्यात आलेला आहे. हा टॅग त्या उत्पादनाचं नाव आणि ठिकाण यांची खास ओळख बनवतं. (7 महिन्याच्या चिमुरडीचा जीव वाचवण्यासाठी हवे होते 16 कोटी, जमा झाले केवळ 40 लाख) केळ्यांची खासियत तसं तर जगभरात केळ्यांचं उत्पादन घेतलं जातं. भारतातही विविध ठिकाणी केळीच्या बागायती आहेत. मात्र, जळगाव जिल्ह्यामधल्या केळ्यांना GI मानांकन मिळालं आहे. या केयामध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि मिनरल्स असतात. त्यामुळेच 2016साली या केळ्यांचं GI रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने कृषी क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केली आहे. भारतामधून निर्यात होणाऱ्या शेती उत्पादनांची संख्यादेखील वाढली आहे. त्यातही केळ्यांची निर्यात लक्षणीय वाढली आहे. (केदारनाथ महाप्रलय : आंधळ्या राणानं वाचवला होता स्वतःसोबत आणखी एकाचा जीव) 2018-19 या वर्षभरामध्ये 1. 34 लाख टन म्हणजेच 413 कोटी रुपयांच्या केळ्यांची निर्यात झाली होती तर, 2019 -20 या वर्षामध्ये ही निर्यात वाढून 1.95 लाख टन झाली. त्यांची किंमत 660 कोटी रुपये सांगितली जाते. तर, 2020-21 मध्ये कोरोनाच्या संकटात देखील भारताने एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत 1.91 लाख टन म्हणजेच 619 करोड रुपये किंमतीची केळी निर्यात केलेली आहेत. भारतात आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र,केरळ, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश मध्ये देखील केळीचं उत्पादन घेतलं जातं. तर जगभरामध्ये केळ्यांच्या उत्पादनात भारताचा 25 टक्के वाटा आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Business, Dubai, Jalgaon

    पुढील बातम्या