मराठी बातम्या /बातम्या /देश /

केदारनाथ महाप्रलय : आंधळ्या व्यक्तीनं वाचवला होता स्वतःसोबत आणखी एकाचा जीव, सांगितला त्या रात्रीचा थरार

केदारनाथ महाप्रलय : आंधळ्या व्यक्तीनं वाचवला होता स्वतःसोबत आणखी एकाचा जीव, सांगितला त्या रात्रीचा थरार

2013 सालातील 16-17 जूनची (2013 North India floods) ती रात्री उत्तराखंडच्या इतिहासातील काळी रात्र ठरली होती. केदारनाथमधील (Kedarnath Flood) महाप्रलयाची भयंकर स्थिती आपल्या डोळ्यांदेखत पाहिलेल्या अनेकांनी आजपर्यंत याठिकाणचा प्रसंग सांगितला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Kiran Pharate

देहरादून 16 जून : 2013 सालातील 16-17 जूनची (2013 North India floods) ती रात्री उत्तराखंडच्या इतिहासातील काळी रात्र ठरली होती. 2013 मध्ये केदारनाथमधील (Kedarnath Flood) महाप्रलयाची भयंकर स्थिती आपल्या डोळ्यांदेखत पाहिलेल्या अनेकांनी आजपर्यंत याठिकाणचा प्रसंग अनेकदा सांगितला आहे. मात्र, यावेळी एका अशा व्यक्तीनं या दुर्घटनेचा अनुभव सांगितला आहे, जो जन्मापासूनच आंधळा आहे. विशेष बाब म्हणजे केदारनाथ महाप्रलयावेळी या व्यक्तीनं स्वतःचा जीव तर वाचवलाच मात्र सोबतच त्यानं आणखी एका व्यक्तीलाही जीवदान दिलं.

स्वत: ला काय सेलिब्रिटी समजतो का? हायकोर्टाने गजानन मारणेला झापले

केदारनाथमध्ये 2013 ला आलेल्या महाप्रलयात 169 भाविकांचा मृत्यू झाला तर 4021 जण बेपत्ता झाले होते.या महाप्रलयानं अनेकांचे जीव घेतले, तर काही लोक या कठीण प्रसंगातूनही स्वतःला वाचवण्यात यशस्वी ठरले. अनेकांनी यावेळी डोळ्यांनी पाहिलेला तो प्रसंग आणि आपले अनुभव सांगितले आहेत. मात्र, या दुर्घटनेवेळी त्याठिकाणी एका असा व्यक्तीदेखील उपस्थित होता, जो लहानपणापासून आंधळा आहे. या व्यक्तीचं नाव धर्मा राणा असून महाप्रलयाच्या दिवशी ते केदारनाथमध्येच उपस्थित होते. या व्यक्तीनं आजपर्यंत आपल्या डोळ्यांनी काहीही पाहिलेलं नाहा, मात्र त्या काळ्या रात्री या व्यक्तीनं जे अनुभवलं ते आठवून आजही त्यांच्या अंगावर काटा येतो.

वृद्धाला झालेल्या मारहाण प्रकरणाला धार्मिक रंग, ट्विटरसह 9 जणांवर गुन्हा दाखल

धर्मा यांनी या महाप्रलयातून केवळ स्वतःचा बचाव केला नाही, तर आपल्यासोबतच आणखी एका व्यक्तीला जीवदान दिलं. धर्मा म्हणाले, की तुम्ही या गोष्टीचा अंदाज लावू शकता, की या महाप्रलयात काहीही पाहू न शकणाऱ्या एका व्यक्तीनं कशाप्रकारे स्वतःचा आणि एका व्यक्तीचा जीव वाचवला असेल. तो प्रसंग आठवून धर्मा म्हणतात, की ज्यासोबत देवाची साथ असते, त्याला कोणीही मारू शकत नाही. या घटनेनंतर धर्मा यांची बाबा केदारनाथ यांच्या प्रती आणखीच श्रद्धा वाढली. आज कोरोना महामारीच्या काळातही ही श्रद्धा कायम आहे. आजही कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी धर्मा केदारनाथ बाबांचे भजन म्हणतात.

First published:

Tags: Uttarakhand, Uttarakhand floods