Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /देश /

गंगा नदीत तरंगणाऱ्या पेटीतून येत होता रडण्याचा आवाज; उघडून बघताच सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का

गंगा नदीत तरंगणाऱ्या पेटीतून येत होता रडण्याचा आवाज; उघडून बघताच सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का

एका नावाड्याला गंगा नदीत वाहून येणारा एक बॉक्स दिसला आणि तो उघडून बघताच त्याला धक्का बसला.

एका नावाड्याला गंगा नदीत वाहून येणारा एक बॉक्स दिसला आणि तो उघडून बघताच त्याला धक्का बसला.

एका नावाड्याला गंगा नदीत वाहून येणारा एक बॉक्स दिसला आणि तो उघडून बघताच त्याला धक्का बसला.

  • Published by:  Atharva Mahankal

गाजीपूर (उत्तर प्रदेश) 16 जून : 'देव तारी त्याला कोण मारी' हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहे. तुम्ही जर नदीच्या किनाऱ्यावर (Ganga River) उभे आहात आणि अचानक तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी गोष्ट तुमच्याबरोबर घडली तर? असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गाझीपूर (Ghazipur) इथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर घडला आहे. एका नावाड्याला गंगा नदीत वाहून येणारी एक पेटी दिसली आणि ती उघडून बघताच त्याला धक्का बसला.

गंगा नदीत नाव चालताना या नावाड्याला एक लाकडाचा बॉक्स नदीत तरंगताना दिसला. कुतूहलानं तो नावाडी पेटीजवळ  गेला आणि त्यानं पेटी उघडली. त्यात एक नवजात मुलगी (Girl child found in river Ganga floating in box) सापडली. पेटीमध्ये दुर्गा देवीच्या फोटोबरोबरच अनेक देवी-देवतांचे फोटोही होते. तसंच या नवजात मुलीची जन्मपत्रिकाही होती अशी माहिती मिळाली आहे.

या नावाड्याचं नाव गुल्लू चौधरी असं आहे.  मंगळवारी संध्याकाळी त्यांना नदीकाठी एक लाकडी पेटी आढळली. त्या पेटीतून  रडण्याचा आवाज येत होता. या पेटीला पाहून घाटावर उपस्थित काही लोकही जमले. जेव्हा त्यांनी बॉक्स उघडला तेव्हा लोक चकित झाले. यात मुलगी ओढणीमध्ये गुंडाळलेली आढळली. यानंतर लगेचच पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनाही या नवजात मुलीला  आशा ज्योती केंद्रात सुरक्षितरित्या पोहोचवलं.

हे वाचा -30 वर्षाच्या नोकरीनंतर MAला प्रवेश; पुण्यातील 56 वर्षीय महिलेनं पटकावली 4 पदकं

सरकार करणार पालन पोषण

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा दंडाधिकारी गाझीपूर यांना आदेश दिले की नवजात मुलीला चिल्ड्रेन होममध्ये  ठेवण्यात यावं आणि सरकारी खर्चानं तिचं पालन पोषण करण्यात यावं. यासह, त्या मुलीचा जीव वाचविणार्‍या नावाड्यालाही शासकीय निवासस्थानासह सर्व सुविधा पुरवाव्यात.

अवघ्या तीन आठवड्यांची चिमुकली

जन्मपत्रिकेत या नवजात मुलीचं नाव गंगा असं लिहिलं होतं . तिचा जन्म 25 मे रोजी झाला होता. म्हणजेच त्याचे वय फक्त तीन आठवडे आहे. नावाड्याच्या कुटुंबातील सदस्यांना या मुलीचं संगोपन करायचं होतं, परंतु स्थानिक लोकांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. अंधश्रेद्धेपोटी या चिमुकलीला गंगा नदीत सोडून देण्यात आलं असा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे.

First published:

Tags: Ganga river, Small child, Uttar pardesh