जाहिरात
मराठी बातम्या / मनी / खूशखबर! ही बँक त्यांच्या ग्राहकांना देत आहे मोफत रेशन, वाचा कुणाला मिळतोय लाभ?

खूशखबर! ही बँक त्यांच्या ग्राहकांना देत आहे मोफत रेशन, वाचा कुणाला मिळतोय लाभ?

खूशखबर! ही बँक त्यांच्या ग्राहकांना देत आहे मोफत रेशन, वाचा कुणाला मिळतोय लाभ?

बँकेकडून दिल्या जाणारं रेशन किट घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या शाखेमध्ये संपर्क करावा लागेल. वाचा सविस्तर माहिती

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 जून: कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Second Wave of Coronavirus) लोकांचे राहणीमान मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. अशावेळी विविध संस्था नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहे. बँकेनांही ग्राहकांसाठी काही विशेष सवलती देऊ केल्या आहेत. दरम्यान आयडीएफसी फर्स्ट बँकेने (IDFC FIRST Bank) ग्राहकांसाठी एक अनोखी योजना सुरू केली आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेने आता त्यांच्या ग्राहकांना मोफत रेशन (Free Ration) देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने ‘घर-घर रेशन’ (Ghar Ghar Ration) या मोहिमेची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची आणि कमी उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांची मदत केली जाणार आहे. काय आहे मोहीम? घर-घर रेशन या कार्यक्रमात बँकेच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांना कोव्हिड कस्टमर केअर फंडच्या माध्यमातून त्यांचं योगदान दिलं आहे. बँकेने या उपक्रमाअंतर्गत 50000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांना निवडलं आहे जे कोरोनामुळे प्रभावित झाले आहेत. या ग्राहकांना आता रेशन किट दिलं जात आहे. या रेशन किटमध्ये 10 किलो तांदुळ/पीठ, 2 किलो डाळ, 1 किलो साखर आणि मीठ, 1 किलो खाद्यतेल, मिश्रित मसाल्यांचे 5 पॅकेट्स, चहा आणि बिस्किट्स इ. गोष्टी आहेत. यामध्ये एका छोट्या कुटुंबाला महिनाभराची मदत होईल इतकं सामान आहे. हे वाचा- 12 दिवसात 2 रुपयांनी महागलं इंधन, अनेक शहरात पेट्रोलचे दर 105 रुपयांपेक्षा जास्त घरोघरी जाऊन कर्मचारी देत आहेत रेशन बँकेकडून दिल्या जाणारं रेशन किट घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या शाखेमध्ये संपर्क करावा लागेल. ग्रामीण भागात रेशन किट कर्मचाऱ्यांच्या मार्फत घरोघरी जाऊन वाटलं जात आहे आणि शहरी भागात कर्मचारी प्रीपेड कार्ड प्रदान करत आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि हरयाणामध्ये 1000 रेशन किट्सचं वाटप यशस्वीपणे पूर्ण झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात