• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • 1 लाखाचे झाले 7.50 लाख, अवघ्या 6 महिन्यांत 'या' शेअरनं दिला 650% परतावा

1 लाखाचे झाले 7.50 लाख, अवघ्या 6 महिन्यांत 'या' शेअरनं दिला 650% परतावा

गेल्या काही महिन्यापासून अनेक नवीन शेअर्सनी विक्रमी परतावा दिला असून, 2021च्या मल्टिबॅगर शेअर्सच्या यादीत स्थान मिळवलं आहे. एएनजी लाइफसायन्स (Invest in ANG Lifesciences shares) हा या यादीतला एक आघाडीचा शेअर आहे

  • Share this:
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: शेअर बाजारात गुंतवणूक (How to invest in Share Market) करण्यात जोखीम असली, तरी कधीकधी थोडी जोखीम पत्करून केलेली थोडीशी गुंतवणूक भरभरून फायदा देऊन जाते. अभ्यास करून चांगल्या शेअर्सची निवड केली, तर शेअर बाजारातली गुंतवणूक चांगला नफा देणारी ठरते. एखाद्या शेअरची किंमत अगदी अल्पावधीत कित्येक पटींनी वाढते. अशा शेअर्सना मल्टिबॅगर (Investing in Multibagger Shares) असं संबोधलं जातं. अशाच एका मल्टिबॅगर शेअरची सध्या जोरदार चर्चा आहे. या शेअरने अवघ्या सहा महिन्यांत तब्बल 650 टक्के परतावा दिला आहे. सध्या शेअर बाजारात तेजीचं वातावरण असून, दररोज दोन्ही प्रमुख निर्देशांक नवनवीन विक्रम नोंदवत आहेत. अनेक नवीन शेअर्सनी विक्रमी परतावा दिला असून, 2021च्या मल्टिबॅगर शेअर्सच्या यादीत स्थान मिळवलं आहे. एएनजी लाइफसायन्स (Invest in ANG Lifesciences shares) हा या यादीतला एक आघाडीचा शेअर आहे. औषधनिर्मिती अर्थात फार्मा क्षेत्रातल्या  कंपनीच्या या शेअरनं 85.50 रुपये किमतीवरून आज 642.10 रुपयांची पातळी गाठली आहे. अवघ्या सहा महिन्यांत या शेअरच्या किमतीत ही वाढ झाली आहे. त्यामुळे यात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. हे वाचा-GST Council Meeting 2021: 75 रुपये प्रति लीटरने मिळणार पेट्रोल? आज होणार निर्णय गेल्या पाच सत्रांमध्ये या शेअरने 744.70 रुपयांची उच्चांकी पातळीही गाठली होती. मात्र या किंमत पातळीवर टिकून राहणं या शेअरला शक्य झालं नाही आणि त्याची किंमत 744.70 रुपयांच्या पातळीवरून 642.10 रुपयांपर्यंत खाली घसरली. गेल्या एका महिन्यात या शेअरने 527 रुपयांची नीचांकी पातळीही गाठली होती; मात्र पुन्हा त्यात सुधारणा होऊन तो 642.10 रुपयांवर आला आहे. महिन्याभरात त्याने 22 टक्के वाढ नोंदवली, तर गेल्या सहा महिन्यांत त्याने 650 टक्क्यांच्या जवळपास परतावा दिला आहे. हे वाचा-खूशखबर! होम आणि कार लोनवरील EMI होणार कमी, SBI-PNB नंतर या बँकेने घटवले व्याजदर सहा महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणूकदाराला आज 7.50 लाख रुपये मिळाले आहेत. एखाद्या गुंतवणूकदारानं एक महिन्यापूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला आज 1 लाख 22 हजार रुपये मिळाले असते. एखाद्या गुंतवणूकदाराने 3 महिन्यांपूर्वी यात एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला आता 3 लाख 56 हजार रुपये मिलळाले असते. कारण 16 जून 2021 रोजी या एका शेअरची किंमत 180.35 रुपये होती. ती आता 642.10 रुपये झाली आहे. या तीन महिन्यांच्या काळात यात सुमारे तिप्पटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. अजूनही या शेअरमध्ये वाढीला संधी असून, नवीन गुंतवणूकदारांनी यात सध्याच्या किमतीलाही हा शेअर खरेदी करावा, अशी शिफारस शेअर बाजार तज्ज्ञांनी केली आहे. 750 ते 800 रुपयांचे उद्दिष्ट ठेवून सध्याच्या किमतीला एएनजी लाइफसायन्सेसचा शेअर खरेदी करावा; मात्र स्टॉप लॉस जरूर लावावा, असा सल्ला चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बागडिया यांनी दिला आहे.
First published: