700 रुपयांचा LPG सिलेंडर मिळू शकेल केवळ 200 रुपयात! वाचा कशी मिळवाल ऑफर

700 रुपयांचा LPG सिलेंडर मिळू शकेल केवळ 200 रुपयात! वाचा कशी मिळवाल ऑफर

LPG cylinder: एलपीजी गॅसवर मिळणाऱ्या अशा एका ऑफर बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामध्ये साधारण 700 ते 750 रुपये किंमतीला असणाऱ्या lpg gas cylinder वर तुम्ही 500 रुपयांची बचत करू शकता

  • Share this:

नवी दिल्ली, 29 डिसेंबर: घरगुती गॅस सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) वापर देशभरामध्ये शहरांपासून गावापर्यंत केला जातो. सरकारने अलीकडेच एलपीजी गॅसच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली आहे. ज्यानंतर विना-सबसिडीचा 14.2 किलोग्रॅमचा सिलेंडर  644 रुपयांवरून 694 रुपयाने मिळत आहे. सिलेंडरच्या किंमतीमध्ये डिसेंबर महिन्यात दोन वेळा बदलाव करण्यात आले. मात्र या महागाईच्या काळातही तुम्ही सिलेंडर केवळ जवळपास  200 रुपयांनी मिळवू शकता. जाणून घ्या कशी मिळवाल ही ऑफर

तुम्ही पीटीएम (Paytm) वर एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगवर (LPG cylinder) 500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता. देशातील अधिकांश भागामध्ये साधारण 700 ते 750 रुपये या दराने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची विक्री केली जात आहे. अशावेळी या ऑफरचा फायदा घेत तुम्ही केवळ 200 ते 250 रुपयांपर्यंत HP, Indane, Bharat Gas एलपीजी सिलेंडर मिळवू शकता.

Paytm वरून कशाप्रकारे बुक कराल LPG सिलेंडर?

-सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये Paytm app  डाऊनलोड करा

-अॅप उघडल्यानंतर 'recharge and pay bills'वर क्लिक करा

(हे वाचा-Mutual Funds मध्ये गुंतवणूक करताय? नव्या वर्षापासून होणार हे 5 महत्त्वाचे बदल)

-याठिकाणी भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेन यापैकी तुमचा एलपीजी गॅस सिलेंडर प्रोव्हायडर निवडा

-रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून तुमचा LPG ID दाखल करा

-यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल

-याठिकाणी पेमेंट करण्याआधी 'FIRSTLPG' हा प्रोमो कोड वापरा

(हे वाचा-तुम्ही LIC पॉलिसी घेणार असाल तर या बाबतीत व्हा सावधान! अन्यथा बुडतील सर्व पैसे)

कधीपर्यंत आहे ही ऑफर?

हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, पेटीएमवरून पहिल्यांदा बुकिंग करणारे ग्राहकच 500 रुपयांपर्यंत कॅशबॅकची ऑफर मिळवू शकतात. Paytm LPG Cylinder Booking Cashback Offer या ऑफरचा लाभ ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत घेता येईल. अर्थात स्वस्तात सिलेंडर मिळवण्यासाठी तुमच्याकडे केवळ 2 दिवस शिल्लक आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 29, 2020, 3:51 PM IST

ताज्या बातम्या