Home /News /money /

सिनेमाच्या तिकीटावर मिळवा 50 टक्के डिस्काउंट; 'या' बँकेच्या क्रेडिट कार्डवर ऑफर

सिनेमाच्या तिकीटावर मिळवा 50 टक्के डिस्काउंट; 'या' बँकेच्या क्रेडिट कार्डवर ऑफर

देशातली सातव्या क्रमाकांची सरकारी बँक असलेल्या इंडियन बँकेनेदेखील (Indian Bank) आपल्या ग्राहकांसाठी चांगली ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत सिनेमाच्या तिकिटांच्या खरेदीवर बँकेकडून 50 टक्के डिस्काउंट दिला जात आहे.

मुंबई, 15 नोव्हेंबर : कोरोनाची ( corona) लाट ओसरल्यानंतर राज्य सरकारनं टप्प्याटप्प्यानं एकेक क्षेत्र खुलं केलं. शाळा-महाविद्यालयं, धार्मिक स्थळं, सिनेमा थिएटर्स व नाट्यगृहं ( Cinemas and Theaters) खुली करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्यानुसार सिनेमागृहं आणि मल्टिप्लेक्स उघडण्यात आली आहेत. त्यामुळे सिनेमा पाहण्यासाठी हळूहळू सिनेमागृहाकडे प्रेक्षकांचे ( Audiences) पाय वळू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर इंडियन बँकेने ( Indian Bank) एक मोठी स्कीम लागू केली आहे. या बँकेचं क्रेडिट कार्ड ( credit card) वापरून सिनेमाचं तिकीट ( Movie Ticket) काढल्यास तिकिटाच्या किमतीवर तब्बल 50 टक्क्यांचा डिस्काउंट ( discount) बँक देणार आहे. 'झी न्यूज'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सिनेमागृहात सिनेमा पाहण्यासाठी अनेक दिवसांपासून वाट पाहणारे प्रेक्षक, सिनेमागृह सुरू होताच कुटुंबीय, मित्रपरिवारासह आणि जवळच्या मित्रमंडळींसह सिनेमा पाहण्यासाठी जात आहेत. तुम्हालाही सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहणं आवडत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सध्या कोरोनाच्या भीतीने काही जण सिनेमागृहात जाणं टाळत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सिनेमा हॉल, बँका, तिकीट बुकिंग अॅप्स विविध ऑफर्स देत आहेत. देशातली सातव्या क्रमाकांची सरकारी बँक असलेल्या इंडियन बँकेनेदेखील (Indian Bank) आपल्या ग्राहकांसाठी चांगली ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत सिनेमाच्या तिकिटांच्या खरेदीवर बँकेकडून 50 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. तुम्ही इंडियन बँकेचे ग्राहक असल्यास तुमचं क्रेडिट कार्ड वापरून बुक माय शो ( BookMyShow) या वेबसाइटवर जाऊन तिकिट बुक केल्यास तुम्हाला 50 टक्क्यांचा डिस्काउंट मिळेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी बँकेने घातलेल्या अटी व शर्ती पाहू या. वर्षभरात 'हा' शेअर 16 टक्के वाढणार, MOTILAL OSWAL चा अंदाज; तुमच्याकडे आहे का? >> ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे इंडियन बँकेचं रुपे क्रेडिट कार्ड असणं आवश्यक आहे. >> तुम्हाला 'बुक माय शो' अॅप किंवा वेबसाइटवर जाऊन चित्रपटाची तिकिटं बुक करावी लागतील. >> एका कार्डवरून तुम्ही महिन्यातून एकदाच या ऑफरचा लाभ घेऊ शकता. >> तिकीट बुकिंगवर तुम्हाला 50 टक्के डिस्काउंट मिळेल. >> तुम्हाला एका वेळी जास्तीतजास्त 250 रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. >> ही ऑफर 31 डिसेंबर 2021 पर्यंत वैध आहे. फक्त 53 हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय आणि कमवा 35 लाख रुपये! कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जनजीवन पुन्हा रुळावर आलं आहे; मात्र अद्यापही कोरोनाचा धोका संपलेला नाही. हळूहळू नागरिक या विषाणूसोबत जगायला शिकत आहेत. दैनंदिन जीवन आणि देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारही सर्व आवश्यक पावलं उचलत आहे. सरकारने आवश्यक नियमावलीसह सिनेमागृहं सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात जाण्यासोबतच प्रेक्षकांनी कोविड नियमांचं पालन करणंदेखील आवश्यक आहे. बराच काळ बंद असलेली सिनेमागृहं सुरू झाल्यानंतर अधिकाधिक प्रेक्षक येण्यासाठी ऑफर्स दिल्या जात आहे. याचा फायदा सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याची आवड असणाऱ्या प्रेक्षकांना होऊ शकतो.
First published:

Tags: Bank, Lockdown, Upcoming movie

पुढील बातम्या