Home /News /national /

मातीच्या घरात ऑफिस आणि मैदानाचा रनवे, 'एअर इंडिया'ने असा घेतला टेक ऑफ

मातीच्या घरात ऑफिस आणि मैदानाचा रनवे, 'एअर इंडिया'ने असा घेतला टेक ऑफ

'एअर इंडिया'च्या लोगोवर लाल रंगाचा उडणारा हंस आहे. यामध्ये नारिंगी रंगाचं कोणार्क चक्रही आहे. कंपनीचा लकी मॅस्कॉट असलेला महाराजा पहिल्यांदा 1946 मध्ये दिसला.

    नवी दिल्ली, 27 जानेवारी : एअर इंडिया(Air India Stake Sale)च्या लोगोवर लाल रंगाचा उडणारा हंस आहे. यामध्ये नारिंगी रंगाचं कोणार्क चक्रही आहे. कंपनीचा लकी मॅस्कॉट असलेला महाराजा पहिल्यांदा 1946 मध्ये दिसू लागला. काही दिवसांतच हा महाराजा एअर इंडियाची ओळख बनला. अशी झाली सुरुवात एअर इंडिया कंपनी एप्रिल 1932 ला अस्तित्वात आली. उद्योगपती जेआरडी टाटा यांनी या कंपनीची स्थापना केली होती पण याचं नाव एअर इंडिया नव्हतं. तेव्हा त्याचं नाव टाटा एअरलाइन्स असं होतं. जेआरडी टाटा यांनी 1919 मध्ये पहिल्यांदा हे शौक म्हणून विमानाचं उड्डाण केलं तेव्हा ते फक्त 15 वर्षांचे होते. त्यांनी एक इंजिन असलेलं विमान अहमदाबादहून कराचीमार्गे मुंबईला नेलं होतं. यामध्ये प्रवासी नव्हते तर 25 किलोची पत्रं होती. ही पत्रं इम्पिरियल एअरवेजने कराचीला आणण्यात आली होती. फक्त 2 पायलट टाटा एअरलाइन्ससाठी 1933 हे पहिलं व्यावसायिक वर्ष होतं. टाटा सन्सच्या या कंपनीच्या विमानाने 155 प्रवाशांनी प्रवास केला. टाटा एअरलाइन्सचं कार्यालय मुंबईत जुहूजवळ एका मातीच्या घरात होतं. तिथेच असलेलं एक मैदान रनवे म्हणून वापरलं जायचं. पावसाळ्यात या मैदानात पाणी भरायचं. अशा वेळी जेआरडी टाटा आपली विमानं पुण्यातून ऑपरेट करायचे. टाटा एअरलाइन्सकडे दोन छोटी सिंगल इंजिन असलेली विमानं, 2 पायलट आणि 3 मेकॅनिक होते. पहिले इंग्रज पायलट ब्रिटन शाही रॉयल एअरफोर्सचे होमी भरुचा टाटा एअरलाइन्सचे पहिले पायलट होते. जेआरडी टाटा आणि व्हिन्सेंट हेही दोघं पायलट होते. 29 जुलै 1946 ला टाटा एअरलाइन्स पब्लिक लिमिटेड कंपनी बनली आणि तिचं नाव एअर इंडिया लिमिटेड असं ठेवण्यात आलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने एअर इंडियामध्ये 49 टक्के भागिदारी घेतली. ==============================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Air india, Modi sarkar

    पुढील बातम्या