मराठी बातम्या /बातम्या /मनी /अदानी समूहाला मोठा फटका, अवघ्या तासाभरात शेअर बाजारात 73 हजार कोटींचं नुकसान

अदानी समूहाला मोठा फटका, अवघ्या तासाभरात शेअर बाजारात 73 हजार कोटींचं नुकसान

देशातील दुसरे सर्वांत श्रीमंत उद्योजक आणि अदानी समूहाचे प्रवर्तक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले आणि अवघ्या एका तासात या समुहाचं तब्बल 73 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं.

देशातील दुसरे सर्वांत श्रीमंत उद्योजक आणि अदानी समूहाचे प्रवर्तक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले आणि अवघ्या एका तासात या समुहाचं तब्बल 73 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं.

देशातील दुसरे सर्वांत श्रीमंत उद्योजक आणि अदानी समूहाचे प्रवर्तक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले आणि अवघ्या एका तासात या समुहाचं तब्बल 73 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं.

मुंबई, 14 जून : एखादी विपरीत बातमी आली की सर्वांत आधी शेअर बाजारावर परिणाम दिसून येतो. अगदी काही क्षणात यशाच्या शिखरावर असणारा शेअर भुईसपाट होतो, याचं उदाहरण आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात दिसून आलं. आज भारतीय शेअर बाजार सुरू होताच फक्त एका बातमीनं आशियातील आणि देशातील दुसरे सर्वांत श्रीमंत उद्योजक आणि अदानी समूहाचे प्रवर्तक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले आणि अवघ्या एका तासात या समुहाचं तब्बल 73 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं.

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. ने (NSDL) पारदर्शकतेच्या अभावाचा ठपका ठेवत अदानी समूहातील तीन संस्थात्मक गुंतवणुकदारांवर कारवाई केली आहे. ही बातमी जाहीर होताच शेअर बाजारात खळबळ माजली. अदानी यांच्या नेतृत्वाखालील या समूहातील 6 पैकी 5 कंपन्यांच्या शेअर्सना आज लोअर सर्किट लागलं. त्यामुळे समूहाचं बाजारमूल्य 15 अब्ज डॉलर्सनी कमी झालं.

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. (NSDL)नं (National Securities Depository Ltd) (NSDL) अदानी समूहातील कंपन्यांमध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केलेल्या अब्दुल्ला इन्व्हेस्टमेंट फंड (Albula Investment Fund), क्रिस्टा फंड (Cresta Fund) आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड (APMS Investment Fund) या तीन परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांची खाती गोठवली.

एनएसडीएलच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 31 मे किंवा त्याआधी या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची खाती गोठवण्यात आली आहेत, अर्थात फ्रीज करण्यात आली आहेत.

पारदर्शकतेच्या अभावामुळे नियामकांची कारवाई -

या तीन संस्थांनी गौतम अदानींच्या चार कंपन्यांमध्ये मिळून तब्बल 43 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, त्यांच्याकडे अदानींच्या चार कंपन्यांचे 43 हजार 500 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. या तीन कंपन्यांनी एकत्रितरित्या अदानी एंटरप्राईझेसमध्ये 6.82 टक्के शेअर्स, अदानी ट्रान्समिशनमध्ये 8.03 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.92 टक्के आणि अदानी ग्रीनमध्ये 3.58 टक्के शेअर्स विकत घेतले आहेत.

(वाचा - स्वस्तात घर खरेदीची संधी; PNB कडून होणार 12865 घरांची विक्री, पाहा डिटेल्स)

2019 मध्ये नियामकांनी परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी केवायसी डॉक्युमेंटेशन पीएमएलएनुसार केलं. 2020 पर्यंत नव्या नियमांनुसर पूर्तता करण्यासाठी मुदतही देण्यात आली. यामध्ये संयुक्त मालकीसह, फंड व्यवस्थापक आदी कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती देणं आवश्यक होतं. त्याचवेळी नियामांचं पालन न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचा इशाराही सेबीने दिला होता.

तसंच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग अ‍ॅक्टअंतर्गत बेनीफिशियल ऑफ ओनरशिपची (Beneficial Of Ownership) म्हणजेच या कंपन्यांच्या मालकीविषयीची माहिती देणं अत्यावश्यक आहे, मात्र त्यात पुरेशी पारदर्शकता नसल्याने एनएसडीएलनं ही कारवाई केली असल्याचं विधी सल्लागार कंपनीनं म्हटलं आहे.

कारवाईचा अर्थ -

या परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांची शेअर बाजारातील खाती गोठवल्यानं आता या संस्थांना त्यांनी गुंतवणूक केलेल्या कंपन्यांमधील (अदानींच्या कंपन्या) शेअर्सची विक्री करता येणार नाही किंवा नवीन शेअर्सची खरेदी देखील करता येणार नाही.

नियामक संस्था अशी कारवाई करण्यापूर्वी या कंपन्यांना पूर्वसूचना देतात, मात्र त्याला प्रतिसाद न दिल्यास त्यांची शेअर बाजारातील खाती गोठवण्यात येतात, अदानी समूहाच्या बाबतीत देखील अशीच कारवाई झाली असल्याचं अधिकारी सूत्रांनी म्हटलं आहे.

(वाचा - तुम्हीही बँकेत FD केली असेल तर जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी)

याबाबत अदानी समूहाने अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. अदानी समूहातील सर्व कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तिन्ही संस्था मॉरिशसमधील असून, त्यांनी भारतीय शेअर बाजारात म्हणजेच सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये (सेबी-SEBI) फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स म्हणजे परकीय गुंतवणूकदार अशी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे या तिन्ही गुंतवणूक कंपन्यांचा पत्ता एकच असून तो पोर्ट लुईस येथील आहे आणि या तिन्ही गुंतवणूक कंपन्यांची वेबसाइटसुद्धा नाही.

शेअर्सच्या किमतीबाबत फेरफार -

अदानी समूहाच्या नोंदणीकृत कंपन्यांमधील जवळपास 75 टक्के हिस्सा प्रवर्तकांकडे आहे. उर्वरित शेअर्सपैकी बहुतेक शेअर्स 6 ते 7 विदेशी गुंतवणूकदारांच्या हाती आहेत. त्यामुळे शेअर बाजारात किरकोळ गुंतवणुकदारांसाठी फार कमी शेअर्स खुले असतात. त्यामुळे कृत्रिम मागणी निर्माण केली जाते. कंपनीच्या शेअर्सची किंमत सध्या झपाट्याने वाढत होती, यामागे हेच कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

First published:
top videos