नवी दिल्ली, 14 जून : जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. बाजारातील किंमतीपेक्षा कमी किंमतीत घर घेता येऊ शकतं. देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक पीएनबीने (PNB) खास ऑफर आणली आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) प्रॉपर्टीचा लिलाव करणार आहे. 15 जून रोजी हा लिलाव होणार आहे. यात गुंतवणुकदारांना रेसिडेंशियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, अॅग्रीकल्चर प्रॉपर्टी स्वस्तात मिळणार आहे.
बँक अशा प्रॉपर्टीचा लिलाव करत आहे, जी डिफॉल्ट लिस्टमध्ये आहे. IBAPI (Indian Banks Auctions Mortgaged Properties Information) कडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. Punjab Nationl Bank ने याबाबत ट्विटही केलं आहे.
Not all 2021 goals have to wait. Participate in PNB's Mega e-Auction to get reasonable prices for residential and commercial property. To know more, visit e-Bikray Portal: https://t.co/N1l10rJGGS pic.twitter.com/9P9bgnEz5e
— Punjab National Bank (@pnbindia) June 14, 2021
सध्या बँक 12865 रेसिडेंशियल प्रापर्टीचा (residential properties) लिलाव करत आहे. त्याशिवाय 2808 कमर्शियल प्रापर्टी (commercial properties), 1403 इंडस्ट्रियल प्रापर्टी, 101 अॅग्रीकल्चर प्रापर्टी आहेत. या सर्व प्रापर्टीचा लिलाव बँकेकडून केला जाईल.
पूर्ण कराव्या लागतील या अटी -
- रजिस्ट्रेशन
आपल्या मोबाईल नंबर आणि Email ID चा वापर करुन E-Auction प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करावं लागेल.
- KYC व्हेरिफिकेश
त्यानंतर KYC डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. KYC डॉक्युमेंट E-Auction सर्विस प्रोवाइडर द्वारा व्हेरिफिकेशन केलं जाईल. यासाठी कमीत-कमी दोन वर्किंग डे इतका वेळ लागू शकतो.
- EMD अमाउंट ट्रान्सफर
त्यानंतर E-Auction प्लॅटफॉर्मवर जनरेट झालेल्या चालानचा वापर करुन अमाउंट ट्रान्सफर करावी लागेल. यासाठी NEFT किंवा ऑनलाईन-ऑफलाईन ट्रान्सफरचाही वापर करता येऊ शकतो.
- बिडिंग प्रोसेस आणि ऑक्शन रिझल्ट
इच्छुक रजिस्टर करणारे पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण केल्यानंतर E-Auction प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली लावू शकतात.
ज्या प्रापर्टीच्या मालकांनी त्या जागेचं कर्ज फेडलं नसेल किंवा एखाद्या कारणाने ते कर्ज देऊ शकत नसतील, त्या सर्वांची प्रापर्टी बँकेद्वारा जप्त केली जाते. बँकांकडून वेळोवेळी अशा प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. या लिलावात बँक अशा प्रापर्टी विकून आपली रक्कम वसूल करुन घेतात.
प्रापर्टी लिलावाबाबत अधिक माहितीसाठी https://ibapi.in/ या लिंकवर माहिती घेऊ शकता. E-Auction द्वारे प्रापर्टी खरेदी करायची असेल, तर बँकेत जाऊन प्रक्रिया आणि संबंधित प्रॉपर्टीबाबत माहिती घेता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.