FSSAI नवा नियम, जाडेपणा वाढवणाऱ्या पदार्थांवर आता कडक निर्बंध

FSSAI, Food, fatness, diabetes - देशात विकणाऱ्या पॅकेज्ड फूडचं पॅकिंग लवकरच बदलणार आहे. फूड सेफ्टी अँड अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया (FSSAI )नं नवा ड्राफ्ट तयार करून नियम जारी केलाय

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 01:34 PM IST

FSSAI नवा नियम, जाडेपणा वाढवणाऱ्या पदार्थांवर आता कडक निर्बंध

मुंबई, 28 जून : देशात विकणाऱ्या पॅकेज्ड फूडचं पॅकिंग लवकरच बदलणार आहे. फूड सेफ्टी अँड अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया (FSSAI )नं नवा ड्राफ्ट तयार करून नियम जारी केलाय. त्यानुसार आता पॅकेज्ड फूड कंपनींना पॅकेटवर लाल रंगाचा स्ट्रिकर लावून पदार्थांमध्ये किती फॅट,साखर आणि मीठ आहे हे सांगावं लागेल.

नवे नियम तीन वर्षात टप्प्या टप्प्यानं लागू करणार

FSSAI नं सांगितलंय की पॅकेज्ड फूडमध्ये काय काय वापरलंय, कुठले पदार्थ आहेत हे ग्राहकांना सांगावं लागेल. ग्राहकांना आपण खरेदी करत असलेल्या पदार्थामध्ये काय आहे, हे कळणं हा त्यांचा हक्क आहे. नवे नियम 3 वर्षांमध्ये  टप्प्यात लागू करणार.

बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट आहेत? मग होईल 'हे' नुकसान

देशात डायबेटिस आणि जाडेपणा दिवसेंदिवस वाढतोय. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं दोन वर्षांपूर्वीपासूनच नियमांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आता पॅकेज्ड फूडमध्ये किती मीठ आहे, किती साखर आहे, किती फॅट आहे हे सांगावं लागेल.

Loading...

सनी लिओनी उघडणार शाळा, 'असा' असेल अभ्यास

FSSAI नं या नियमाशी संबंधित ज्या कंपनी आहेत त्यांच्याकडून सुधारणांबद्दल प्रस्ताव मागवलेत. एक महिन्यात हे प्रस्ताव पाठवायला सांगितलेत. त्याप्रमाणे विचार करून नियमांना अंतिम रूप दिलं जाईल.

वेस्टर्न रेल्वेत 725 जागांवर भरती, 'या' उमेदवारांनी करावा अर्ज

लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( FSSAI )चे सीईओ मयंक अग्रवाल यांनी जंक फूडच्या जाहिरातींवर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर विचार केलाय. स्कूल हेल्थकेअरवर झालेल्या एसोचॅमच्या संमेलनात हे सांगितलं. जंक फूड आणि साॅफ्ट ड्रिंकचा जास्त वापर केल्यानं मुलं जाडी होतातच, शिवाय इतर गंभीर आजारांनाही तोंड द्यावं लागतं. खाण्याच्या या संस्कृतीमुळेच छोट्यांमध्ये डायबेटिस आणि हृदय रोगाचं प्रमाण वाढतंय. आरोग्य तज्ज्ञांच्या मते हे असंच राहिलं तर 2030पर्यंत प्रत्येक तीन व्यक्तींपैकी एक व्यक्ती जाडा असेल.

VIDEO: लोकसभेत अमित शहांनी केलं काश्मीरच्या निवडणुकांवर भाष्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: (FSSAI)
First Published: Jun 28, 2019 01:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...