मुंबई, 27 जून : सनी लिओनीनं बाॅलिवूडमध्ये स्वत:चं असं स्थान तयार केलंय. आता ती नव्या क्षेत्रात उडी घेतेय. ती आता शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवतेय. सनी लवकरच नवी शाळा सुरू करतेय. हे एक आर्ट स्कुल असेल. इथे कला आणि संस्कृती शिकवली जाईल. सनीला बरेच दिवस शाळा सुरू करण्याची इच्छा होती. तसे तिचे प्रयत्न सुरू होते. सूत्रांच्या माहितीनुसार सनीची स्कूल डाॅर्ट फ्युजनची एक नवी शाखा असेल. इथे 12 ते 36 महिन्यांच्या मुलांना प्रवेश मिळेल. या मुलांना कला शिकवली जाईल. मुलांना वही, पेन किंवा पेन्सिल देऊन आर्ट आणि क्रिएटिव्हिटी शिकवली जाईल. सनीने केला गौप्यस्फोट, सांगितलं का सोडली पॉर्न इंडस्ट्री सनीची ही शाळा याच वर्षी सुरू होणार आहे. सनी शाळेत आर्ट शिकवणारे शिक्षक नेमेल. सध्या तरी ती यात स्वत: लक्ष घालेल. सनी लिओनीला छोटी मुलं खूप आवडतात. तिनं मुलगी दत्तकही घेतलीय. म्हणूनच ती शाळा उघडण्याचं ठरवतेय. त्यात रस घेतेय. नेहमीच्या अभ्यासाचा कंटाळा आला? मग निवडा ही ऑफबीट करियर SBI ची बंपर ऑफर, Hyundai Venue बुक करा आणि ‘हे’ जिंका सनीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं की, ती कोणताही निर्णय घाईत घेत नाही. एखाद्या गोष्टीबद्दल संभ्रम असेल तर ती निकटवर्तीयांशी त्याबद्दल बोलायलाही लाजत नाही. यातही ती पती डेनियलचा सल्ला नक्कीच घेते. सनीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती ‘कोका कोला’ नावाच्या हॉरर कॉमेडी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. यात ती बिहार, उत्तर प्रदेशमधील भाषा बोलताना दिसणार आहे. या सिनेमासाठी ती फार मेहनत घेत असून एक वेगळा प्रयोग करताना सनी यात दिसणार आहे. SPECIAL REPORT : मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







