नवी दिल्ली, 22 जून: 1 जुलैपासून तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या आर्थिक नियमात (Rules Changing From 1st July 2021) बदल होणार आहेत. ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक बजेटवर परिणाम होऊ शकतो. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder Price) किंमतीत बदल केला जातो. शिवाय SBI एटीएममधून पैसे काढणे आणि चेक संदर्भातील नियमात बदल होणार आहे. जाणून घ्या 1 जुलैपासून कोणत्या नियमांत बदल होणार आहेत. 1. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 1 जुलै रोजी LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होईल. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला नवीन दर निश्चित केले जातात. कंपन्या घरगुती गॅस आणि कमर्शिअल गॅसच्या किंमतीत बदल करतील की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 2. SBI ATM मधून पैसे काढण्यासंदर्भातील नियम 1 जुलैपासून स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) च्या एटीएममधून किंवा बँक शाखेतून 1 जुलैपासून पैसे काढण्यासाठीचे नियम (Cash Withdrawal Rules) बदलत आहेत. चेकबुक (Cheque book) जारी करण्याबाबतही नियमात बदल होत आहेत. एसबीआय बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (BSBD) अकाउंट खातेधारकांना दर महिन्याला चार वेळा मोफत पैसे काढता येतात, ज्यात एटीएम आणि बँक शाखांचा समावेश आहे. मोफत मर्यादेनंतर बँक प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये अधिक जीएसटी आकारण्यात येणार आहे. पैसे काढण्यावर शुल्क होम ब्रँच, एटीएम आणि गैर एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यावर लागू होईल. हे वाचा- SBI च्या 40 कोटींहून अधिक ग्राहकांसाठी अलर्ट! आता ATM मधून पैसे काढणं महागणार 3. चेकबुक शुल्क -SBI BSBD खातेधारकांना एका फायनान्शिअल इयरमध्ये 10 चेकची कॉपी मिळते. आता 10 चेकच्या चेकबुकवर चार्जेस द्यावे लागतील. 10 चेकच्या पानांसाठी बँक 40 रुपये आणि जीएसटी शुल्क आकारेल -25 चेक लीवसाठी बँक 75 रुपये आणि जीएसटी चार्ज करेल. इमर्जन्सी चेकबुकवर 10 पानांसाठी 50 रुपये अधिक जीएसटी द्यावा लागेल. -ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवर नवीन सेवा शुल्कातून सूट दिली जाईल 4. इन्कम टॅक्स तुम्ही अजूनपर्यंत इन्कम टॅक्स भरला नसेल, तर लवकर हे काम पूर्ण करा. Income Tax नियमानुसार जर तुम्ही 30 जूनपूर्वी रिटर्न भरला नसेल तर 1 जुलैपासून तुम्हाला दुप्पट टीडीएस भरावा लागेल. हेच कारण आहे की या नियमामुळे आयटीआर फाइल करण्यासाठी दुसऱ्यांदा संधी दिली जात आहे. आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै असते ती वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. हे वाचा- UAN नंबर विसरलात? घरबसल्या चेक करता येईल PF बॅलेन्स, काढता येतील पैसे 5. बदलणार आयएफएससी कोड कॅनरा बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलैपासून आयएफएससी कोड बदलणार आहे. सिंडिकेट बँकेने ग्राहकांना नवीन आयएफएससी कोड 30 जूनपर्यंत अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. नवीन आयएफएससी कोड जाणून घेण्यासाठी तुम्हाला कॅनरा बँकेच्या वेबसाइटवर जावे लागेल. कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँकेचे विलिनीकरण झाले होते. तर बँक ऑफ बडोदामध्ये देना बँक आणि विजया बँकेचे विलिनीकरण झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.