नवी दिल्ली, 23 डिसेंबर: यूकेमध्ये कोरोना विषाणूचं बदलतं स्वरूप (Super Virulent Strain of CoronaVirus) आढळून आल्यानंतर संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. यूकेमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन (COVID-19 New Strain in UK) अस्तित्त्वात आल्याने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. राजधानी लंडनची ही अत्यंत दयनीय अवस्था पाहता भारतासह जगातील अनेक देशांनी ब्रिटनच्या विमानांवर बंदी घातली आहे. 22 डिसेंबर रात्री 12 वाजल्यापासून ते 31 डिसेंबरपर्यंत भारताने यूकेतून येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व उड्डाणांवर बंदी आणली आहे. एयर इंडियाने (Air India) आखाती देश असणाऱ्या ओमानमध्ये जाणाऱ्या आणि आ देशातून येणाऱ्या विमानसेवेवर बंदी घातली आहे. एअर इंडियाने 22 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2020 दरम्यान ओमान आणि सौदी दरम्यानच्या विमान वाहतुकीवर बंदी घातली आहे.
अशा परिस्थितीत, उड्डाण बंदीच्या कालावधीत ज्यांनी यापूर्वीच तिकीट बुक केले आहेत त्यांना अडणींना सामोरं जावं लागेल. दरम्यान, एअर इंडियाने प्रवाशांना मोफत रिशेड्यूलिंगची सुविधा दिली आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या प्रवासासाठी ही ऑफर देण्यात आली आहे. एअर इंडियाने म्हटले आहे की विमानाचे तिकीट काढल्यानंतर ते रिशेड्यूल किंवा रद्द करण्यावर कोणताही दंड आकारला जाणार नाही. एअर इंडियाने ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये एअर इंडियाने म्हटले आहे की, 22 ते 31 डिसेंबर दरम्यान युके आणि 22 ते 29 डिसेंबर दरम्यान सौदी अरेबिया आणि ओमानदरम्यान तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी एक वेळ फ्री रिशेड्यूलची सुविधा देण्यात येत आहे. ही सुविधा 31 डिसेंबरपर्यंतच्या प्रवासासाठी आहे.
#FlyAI : In view of GoI directive on suspension of flights to UK, from 22nd-31st Dec'20, Oman & Saudi Arabia both from 22nd-29th Dec '20, Air India is offering passengers booked to travel during the period one-time free reschedule for travel completed within 31st Dec '21. (1/2)
रिटनमध्ये (UK) नव्यानं आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या बदलत्या स्वरूपामुळे (Corona Virus mutation) जगभरात चिंतेचं सावट पसरलं आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही (India)ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवा थांबवण्यात आल्या आहेत. एअर इंडिया (Air India), विस्तारा (Vistara), ब्रिटीश एअरवेज (British Airways) आणि व्हर्जिन अटलांटिक (Virgin Atlantic) यांच्या ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या विमानफेऱ्या 22 डिसेंबरपासून रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या 31 डिसेंबरपर्यंत ही बंदी असल्याचं सांगण्यात आलं आहे. इतर अनेक देशांमध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवे, अधिक कडक नियम (Covid-19 guidelines or coronavirus rules) घालण्यात आले आहेत.
त्याचबरोबर सरकारने असेही म्हटले आहे की 22 डिसेंबरपर्यंत यूकेमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी घेणे बंधनकारक आहे. ज्या प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात येईल. विमानतळावरच याबाबत माहिती देण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रवाशांचे अहवाल नकारात्मक आल्यासही 7 दिवस होम क्वारंटाइन राहणं आवश्यक आहे.
दरम्यान 22 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून विमानांवरील बंदी सुरू होणार आहे. त्यामुळे तुमचं विमान 22 तारखेचं असेल तर काळजीचं कारण नाही. अर्थात विमानाची वेळ आधी तपासून घ्या. एअर इंडिया, विस्तारा, ब्रिटीश एअरवेज आणि व्हर्जिन अटलांटीक यांनी आपल्या विमानांच्या वेळापत्रकात बदल केलेला असू शकतो, त्याची खात्री करून घ्या.