• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • पालकांनो सावधान! कोरोनासारख्या व्हायरसपासून वाचवणारा हँड सॅनिटायझर लहान मुलांसाठी धोकादायक

पालकांनो सावधान! कोरोनासारख्या व्हायरसपासून वाचवणारा हँड सॅनिटायझर लहान मुलांसाठी धोकादायक

वारंवार हँड सॅनिटायझर (hand sanitizer) वापरणे मुलांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. त्यामुळे लहान मुलांनी कधी आणि केव्हा हँड सॅनिटायझरचा वापर करावा याची माहिती पालकांनी असावी.

 • myupchar
 • Last Updated :
 • Share this:
  लहान मुलं बदलतं हवामान आणि संक्रमणास अधिक संवेदनशील असतात. अशा परिस्थितीत जीवाणू किंवा विषाणू त्यांना त्वरित आजारी पाडतात. या दरम्यान कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या या युगात लहान मुलांनी हँड सॅनिटायझर वारंवार वापरणं सुरक्षित आहे का? आणि लहान मुलांसाठी हँड सॅनिटायझर (hand sanitizer) किती धोकादायक असू शकतं? असे कित्येक प्रश्न आजकाल पालकांच्या मनात असतात. myupchar.com च्या मते, जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारनंदेखील लोकांना अल्कोहलयुक्त हँड सॅनिटायझरने नियमितपणे हात स्वच्छ करण्याचा सल्ला दिला आहे. तेव्हापासून बाजारात हँड सॅनिटायझरच्या विक्रीचा जणू महापूरच आला आहे. तरी आपण लहान मुलांवर यांचा वापर करताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. सॅनिटायझर रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम करते हँड सॅनिटायझरच्या अति वापराने लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते. काही चांगले जीवाणू देखील असतात, परंतु जेव्हा मुलं कोणत्याही जीवाणूंच्या संपर्कातच येणार नाहीत तर त्याचा त्यांच्या प्रतिकारशक्तीच्या सामर्थ्यावर परिणाम होणं साहजिक आहे. काही पांढऱ्या रक्तपेशी असतात ज्यांना मेमरी टी-सेल्स म्हणतात. हे शरीरातील त्या जीवाणूंना लक्षात ठेवतं जे मागील वेळेस आलेले असतात आणि या टी-सेल्सनी त्यांना लढा दिलेला असतो. जर त्याच जीवाणूंनी पुन्हा हल्ला केला तर याच टी-सेल्स त्यांच्याशी लढून त्यांना मात देतात आणि नवीन विषाणूविरूद्ध लढण्यासाठी सुसज्ज होतात. हे वाचा - Depression वर कशी करावी मात; तज्ज्ञांनी सांगितले सोपे उपाय याचाच अर्थ असा की जर आपण कोणत्याही जीवाणूंच्या संपर्कात राहिलो तर आपली रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्याशी लढून बळकट होते आणि भविष्यात कोणत्याही नवीन जीवाणूंविरुद्ध लढा देऊ शकते. म्हणूनच लहान मुलांनी त्यांची प्रतिकारशक्ती बळकट ठेवली पाहिजे, म्हणूनच गरजेपेक्षा जास्त त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेऊ नका. म्हणूनच खेडे गावातील मुलं फार आजारी पडत नाहीत गावातील लोक अधिक निरोगी आयुष्य जगतात, असं मानलं जातं. विशेषत: शहरी मुलांच्या तुलनेत हंगामी आजारांचा प्रादुर्भाव त्यांच्यावर कमी असतो कारण ग्रामीण भागातील मुले मातीत खेळतात. मातीत खेळण्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. म्हणूनच मुलांची प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी कधीकधी त्यांना स्वच्छ शेतात मातीत खेळण्याची परवानगी दिली पाहिजे. हँड सॅनिटायझरने अॅलर्जीची समस्या हँड सॅनिटायझरच्या जास्त वापराने मुलांमध्ये अॅलर्जीची समस्या देखील उद्भवू शकते. बाजारात उपलब्ध हँड सॅनिटायझरमध्ये अनेक प्रकारची रसायनं मिश्रित असतात ज्यामुळे मुलांमध्ये अॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्याऐवजी सेंद्रिय किंवा हर्बल सॅनिटायझर वापरला पाहिजे. यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. हँड सॅनिटायझर कधी वापरावं वारंवार हँड सॅनिटायझर वापरणे मुलांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. फक्त मुलांबरोबर बाहेर जाताना किंवा आपण एखाद्या आजारी नातेवाईकास भेट देण्यास जात असाल तरच हँड सॅनिटायझर वापरणे आवश्यक आहे. मात्र जर मुलं घरी वारंवार खेळण्यांना स्पर्श करून मग पुन्हा पुन्हा हँड सॅनिटायझर वापरत असतील तर तसं करण्याची मुळीच आवश्यकता नाही. हे वाचा - मधुमेहावर उपचार आणि कोरोनापासून बचाव; एक औषध महिलांसाठी ठरतंय फायद्याचं myupchar.com शी संबंधीत एम्सचे डॉ. अजय मोहन यांच्या मते, कोरोना विषाणूचा उपचार अद्याप आढळलेला नाही आणि त्याची लस किंवा औषधाचा शोध लागेपर्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. हँड सॅनिटायझर आवश्यक आहे. मात्र अतिवापरामुळे त्याने नुकसान होऊ शकते. म्हणून आवश्यकतेनुसार त्याचा वापर करा आणि कोणत्याही प्रकारे प्रतिकूल प्रतिक्रिया आढळल्यास तात्काळ डॉक्टरांना भेटा. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - न्यूमोनिया: लक्षणे, कारणे, उपचार... न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
  First published: