Home /News /money /

LPG Gas Cylinder Prices: आता दर आठवड्याला बदलणार गॅस सिलेंडरची किंमत, वाचा काय आहे योजना

LPG Gas Cylinder Prices: आता दर आठवड्याला बदलणार गॅस सिलेंडरची किंमत, वाचा काय आहे योजना

सरकारी तेल कंपन्यांनी (Govt Oil Companies) आता दर आठवड्याला गॅस सिलेंडर (LPG Gas cylinder Price) च्या किंमतींचा आढावा घेण्याचा विचार करत आहेत.

    नवी दिल्ली, 22 डिसेंबर: आता दर आठवड्याला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती (Gas Cylinder Rates)बदलणार का? असा सवाल सामान्यांना पडला असेल. दरम्यान सरकारी तेल कंपन्या (Govt Oil companies) दर आठवड्याला गॅस सिलेंडरच्या किंमतींचा (LPG Gas cylinder Price)आढावा घेण्याची योजना आखत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सार्वजनिक तेल कंपन्या या योजनेसाठी तयारी करत आहेत. सध्या दर महिन्याला गॅस  सिलेंडरच्या किंमतींचा आढावा घेतला जातो, ज्यानंतर किंमती कमी होतात किंवा वाढतात. महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरचे नवे दर जारी केले जातात. तेल कंपन्यांना मिळेल दिलासा तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेल कंपन्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. दर महिन्याला घेतलेल्या आढाव्यानुसार जर किंमती कमी होत राहिल्या तर तेल कंपन्यांना नुकसान झेलावे लागते. तर या नवीन व्यवस्थेनुसार कंपन्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (हे वाचा-Bank Holidays: 3 दिवस बंद राहणार बँका,खोळंबा टाळण्यासाठी पूर्ण करून घ्या कामं) दोन वेळा वाढले आहेत दर डिसेंबर महिन्यात दोन वेळा एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. ही दरवाढ पाहता एलपीजी वितरकांचं असं म्हणणं आहेकी आता दर आठवड्याला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ होईल. यामुळे तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागेल. डिसेंबरमध्ये या दराने होत आहे एलपीजी गॅसची विक्री IOC च्या वेबसाइटवरील माहितीनुसार 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. त्याचप्रमाणे 5 किलोग्रॅमच्या सिलेंडरमध्ये 18 रुपयांची आणि 19 किलोच्या सिलेंडरमध्ये 36.50 रुपयांची वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असणाऱ्या आयओसी (IOC) च्या मते दिल्लीमध्ये विना-सबसिडीच्या 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत आता 644 रुपये झाली आहे. मुंबईमध्ये देखील हाच दर आहे. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये विना-सबसिडीच्या 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत अनुक्रममे 670.50 रुपये आणि 660 रुपये आहे. (हे वाचा-Gold Price Today: सलग झालेल्या वाढीनंतर आज सोन्याचांदीमध्ये घसरण, वाचा नवे दर) याआधी 1 डिसेंबर रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत तेल कंपन्यांनी वाढ केली होती. 19 किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरचे दर (Commercial Gas Cyliner Price) 55 रुपयांपर्यंत वाढवले होते. दरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात  HPCL, BPCL, IOC या कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ केली नव्हती.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gas, Money

    पुढील बातम्या