नवी दिल्ली, 10 जुलै : सध्याच्या काळात जास्तीत जास्त लोक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये गुंतवणूक करतात. लाइफ इन्शुरन्स तुम्हाला सुरक्षा कव्हर देते. ज्यामुळे कोणत्याही दुर्घटनेच्या वेळी आर्थिक सहाय्यता मिळते. मात्र कोणत्याही लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ तुम्हाला तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही त्याचे प्रीमियम भरतात. पण तुम्हाला इन्शुरन्स एकदम फ्रीमध्ये मिळू शकतं हे तुम्हाला माहिती आहे का? यासाठी तुमच्याजवळ फक्त डेबिट कार्ड असायला हवं.
लोक डेबिट कार्डला एवढं महत्त्व देत नाहीत. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या सुविधांकडेही दुर्लक्ष करतात. डेबिट कार्डवर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतचं लाइफ इन्शुरन्स देखील पूर्णपणे मोफत मिळतो. तुम्ही त्याचा फायदा कसा घेऊ शकता हे जाणून घेऊया. डेबिट कार्डवर इन्शुरन्स कसं मिळवायचं? तुम्ही कोणत्याही बँकेत तुमचे बचत अकाउंट उघडता तेव्हा तुम्हाला डेबिट कार्डवर इन्शुरन्स मिळतो. कारण सेव्हिंग अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला बँकेचे एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड मिळते. यासोबतच कोणत्याही अपघातात मृत्यू झाल्यास लाइफ इन्शुरन्स कव्हर मिळते. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, बँक आपल्या ग्राहकांना, डेबिट कार्डधारकांना वैयक्तिक अपघाती विमा (मृत्यू) नॉन-एअर इन्शुरन्स प्रदान करते. Loan on FD: फिक्स्ड डिपॉझिटवर सहज मिळतं लोन, जाणून घ्या व्याजदर किती कोणत्या कार्डवर किती इन्शुरन्स मिळतं? डेबिट कार्डवर उपलब्ध इन्शुरन्सची रक्कम तुमच्या कार्डवर अवलंबून असते. जर तुमच्याकडे क्लासिक कार्ड असेल तर तुम्हाला 1 लाख रुपयांचं इन्शुरन्स मिळेल. त्याच वेळी, प्लॅटिनम कार्डवर 2 लाख रुपये, सामान्य मास्टर कार्डवर 50 हजार रुपये, प्लॅटिनम मास्टर कार्डवर 5 लाख रुपये आणि व्हिसा कार्डवर 1.5 ते 2 लाख रुपयांपर्यंत इन्शुरन्स फ्रीममध्ये मिळतं. Saving Account मध्ये किती पैसे ठेवावेत? लिमिटपेक्षा जास्त ठेवले तर काय? घ्या जाणून कधी आणि कसं करु शकता क्लेम? डेबिट कार्डवर उपलब्ध लाइफ इन्शुरन्स कोणत्याही कार्ड होल्डरचा अकाली मृत्यू झाल्यास क्लेम केला जाऊ शकतो. क्लेम करणे खूप सोपे आहे. यासाठी कार्ड होल्डरच्या नॉमिनीला संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल. ज्यामध्ये त्याला कार्ड होल्डचे डेथ सर्टिफिकेट, एफआयआरची कॉपी, कार्डधारकावर अवलंबून असलेले प्रमाणपत्र, मृत व्यक्तीच्या प्रमाणपत्राची मूळ कॉपी इत्यादी डॉक्यूमेंटची आवश्यकता असते.