आजच्या युगात श्रीमंत असो की गरीब प्रत्येक व्यक्तीचे बँक अकाउंट असणे आवश्यक आहे. कारण सॅलरीपासून ते मजुरी आणि इतर सरकारी योजनांचे पैसे थेट अकाउंटमध्ये येतात. बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी सेव्हिंग, करंट आणि सॅलरी अकाउंटसारखे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, देशातील बहुतांश लोकांकडे सेव्हिंग अकाउंट आहे.
देशातील बहुतांश ट्रांझेक्शन हे बचत खात्यातूनच केले जातात. परंतु एका सेव्हिंग अकाउंटमध्ये किती पैसे ठेवले पाहिजेत हे तुम्हाला माहिती आहे का? तसे, सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेल्या रकमेची लिमिट नाही. पण, जर सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा केलेले पैसे आयकराच्या कक्षेत येत असतील तर तुम्हाला त्याची माहिती द्यावी लागेल.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनुसार, कोणत्याही बँक अकाउंटमध्ये एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची माहिती देणे बंधनकारक आहे. ही मर्यादा FD, म्युच्युअल फंड, बाँड आणि शेअर्समधील गुंतवणुकीवर देखील लागू होते.
यासोबतच सेव्हिंग अकाउंटवर मिळणाऱ्या व्याजावरही टॅक्स भरावा लागतो. परंतु त्याच्याशी संबंधित काही नियम आहेत. इन्कम टॅक्स अॅक्स सेक्शन 80TTA अंतर्गत, सामान्य लोकांच्या बचत खात्यावर आर्थिक वर्षात मिळणाऱ्या 10,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर कोणताही टॅक्स आकारला जात नाही. व्याजाची रक्कम यापेक्षा जास्त असल्यास टॅक्स भरावा लागतो. यासोबतच, ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50,000 रुपयांपर्यंत आहे.
एवढेच नाही तर सेव्हिंग अकाउंटवरुन मिळणारे व्याज तुमच्या इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या इन्कमशी जोडले जाते आणि त्यानंतर तुम्हाला संबंधित टॅक्स ब्रॅकेटनुसार एकूण उत्पन्नावर टॅक्स द्यावा लागतो.
देशातील आघाडीच्या सरकारी आणि खाजगी बँक सेव्हिंग अकाउंटवर 2.70 टक्के ते 4 टक्के व्याज देत आहेत. 10 कोटी रुपयांपर्यंत बॅलेन्स असलेल्या सेव्हिंग अकाउंटवर व्याज दर 2.70 टक्के आहे आणि 10 कोटींपेक्षा जास्त रकमेसाठी हा दर 3 टक्के आहे. याशिवाय अनेक स्मॉल फायनेंस बँका अटींसह सेव्हिंग अकाउंटवर 7% पर्यंत व्याज देत आहेत.