जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Loan on FD: फिक्स्ड डिपॉझिटवर सहज मिळतं लोन, जाणून घ्या व्याजदर किती

Loan on FD: फिक्स्ड डिपॉझिटवर सहज मिळतं लोन, जाणून घ्या व्याजदर किती

एफडीवर लोन मिळतं का?

एफडीवर लोन मिळतं का?

Loan on FD: फिक्‍स्‍ड डिपॉझिटवरही लोन घेता येते. तुम्ही FD वर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर किती व्याजदर आकारला जाईल आणि किती कर्ज मिळेल हे जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Bank Loan on Fixed Deposit: लोन आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी खूप फायदेशीर असतं. बँकेकडून अनेक प्रकारचे लोन घेता येऊ शकतात. होम लोनपासून पर्सनल लोनपर्यंत तुम्ही बँकेकडून सहज घेऊ शकता. तर काही बँकांच्या योजनांवरुन लोन घेतले जाऊ शकते. बँका या लोनच्या बदल्यात तुमच्याकडून काही व्याज दर चार्ज करतील. सर्व प्रकारच्या लोनवर वेगवेगळे व्याजदर वसूल केले जाते.

News18लोकमत
News18लोकमत

तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटवर कर्ज घेऊ शकता. जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट केलं असेल, तर तुम्ही तुमच्या ठेवींवर कर्ज घेऊ शकता. या रकमेवर बँक तुम्हाला कर्ज देईल. बाजारात उपलब्ध असलेल्या कर्जापेक्षा हे अधिक प्रभावी आणि कमी किमतीचे कर्ज आहे. जे तुम्हाला सोप्या प्रोसेसने मिळेल. यासाठी तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची गरज भासणार नाही. Home Loan : ना सॅलरी, ना इन्कम टॅक्स, तरीही मिळेल होम लोन! फक्त करा हे काम FD वर कर्जाची प्रोसेस आहे सोपी जर तुम्हाला FD वर कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. कोणतीही क्रेडिट कार्ड हिस्ट्री नाही, कमी व्यादर आणि जलद प्रोसेसिंगने लोन मिळेल. या सोप्या प्रक्रियेमुळे एफडीवर कर्ज घेणे अधिक प्रसिद्ध झाले आहे. किरकोळ ग्राहकांसाठी, FD वर क्रेडिट साधारणपणे तीन प्रकारे दिले जाते. डिमांड लोनमध्ये कोणताही निश्चित कालावधी नसतो कारण तुम्ही तुमच्या सोयीनुसार कर्जाची मुदतपूर्ती होण्याआधीची सहमती असलेल्या मुदतीपूर्वी परतफेड करू शकता. त्यासाठी तुम्ही योग्य पैसे देऊ शकता. किती मिळेल लोन अमाउंट अनेक बँका सामान्यत: मुदत ठेवींवर ओव्हरड्राफ्ट (OD) सुविधा देतात. जेव्हा तुम्ही तुमच्या FD वर ओव्हरड्राफ्ट मागता तेव्हा तुमच्या FD वर क्रेडिट मर्यादा मंजूर केली जाते. क्रेडिट मर्यादा सामान्यतः जमा रकमेच्या 70-95 टक्के दरम्यान असते. काही बँका या मर्यादेपेक्षा जास्त ऑफर देखील देऊ शकतात. कर्जाची रक्कम प्रत्येक बँकेनुसार आणि जमा केलेल्या रकमेनुसार बदलते. मात्र, कोणतीही बँक संपूर्ण एफडीवर कर्ज देऊ शकत नाही. Savings Accounts वर भरमसाठ व्याज देतात या बँक, 8 टक्क्यांपर्यंत मिळेल इंटरेस्ट FD वर व्याज दर हे पर्सनल लोनपेक्षा खूप स्वस्त लोन असतं. ज्यावर तुम्ही कर्जाची रक्कम घेऊ शकता. बँका FD च्या वतीने भरलेल्या व्याज दरापेक्षा 50-200 बेस पॉइंट अधिक व्याज दर आकारतात. तुम्ही FD वर कर्ज घेतले तर काही तज्ञांच्या मते या कर्जाच्या रकमेवर 5 ते 8 टक्के व्याज आकारले जाऊ शकते. कोणतीच प्रोसेसिंग फिस नाही हे एक सिक्योर लोन आहे. यावर बँकेकडून कोणतीही प्रोसेसिंग फीस घेतली जात नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात