जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Free Insurance: 'या' 4 गोष्टींवर तुम्हाला मिळते फ्री इन्शुरन्स, अनेकांना तर माहितीही नसेल!

Free Insurance: 'या' 4 गोष्टींवर तुम्हाला मिळते फ्री इन्शुरन्स, अनेकांना तर माहितीही नसेल!

फ्रि इन्शुरन्स

फ्रि इन्शुरन्स

Free Insurance: दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपण वापरतो, परंतु त्यावरील सर्व मोफत सुविधांबाबत आपल्याला माहिती नसते. आज आपण अशाच काही गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Free Insurance: आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक गोष्टींचा वापर करतो. अनेक स्किम्समध्ये गुंतवणूक करतो. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना यांवर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत हे माहीत नसते. आज आम्ही तुम्हाला त्या गोष्टी आणि योजनांबद्दल सांगणार आहोत ज्यावर तुम्हाला फ्री इन्शुरन्सची सुविधा मिळते. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना याची माहिती नसते. चला तर मग जाणून घेऊया.

News18लोकमत
News18लोकमत

स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर एलपीजी सिलिंडर ही एक अशी वस्तू आहे, ज्याचा वापर देशातील एक मोठा वर्ग करतो. परंतु लोकांना माहिती नाही की या सिलेंडरवर मोफत विमा देखील उपलब्ध आहे. हे खरं आहे, एलपीजी कनेक्शन घेतल्यावर पर्सनल अ‍ॅक्सीडेंट कव्हर मिळतं. तसेच गॅस सिलिंडर खरेदीवर विमा संरक्षण देखील उपलब्ध आहे. एलपीजी सिलेंडरमुळे होणारे नुकसान या कव्हरमध्ये मोजले जाते. डेबिट कार्ड आजच्या काळात बहुतांश लोक एटीएम कार्ड वापरतात. पण एटीएमवरही विमा उपलब्ध आहे हे लोकांना माहीत नसेल. एटीएम कार्ड खाजगी बँकेचे असो वा सरकारी, प्रत्येक कार्डासोबत मोफत विमा कवच देखील उपलब्ध आहे. हे अ‍ॅक्सीडेंटल कव्हर 25 हजार ते 20 लाख रुपयांपर्यंत असू शकते. Govt Schemes : तुमच्या मुलींसाठी 5 सरकारी योजना, शिक्षणापासून लग्नापर्यंत भासणारी पैशांची कमतरता! ईपीएफओ तुम्ही नोकरी करत असाल तर दर महिन्याला तुम्ही तुमच्या पगारातून EPFO ​​मध्ये थोडे योगदान देत असाल. पण तुम्हाला माहिती आहे का की EPFO ​​कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम 1976 (EDLI) अंतर्गत 7 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण प्रदान करते. जन ध मात्र EDLI अंतर्गत मिळणारी विमा रक्कम ही गेल्या 12 महिन्यांच्या सॅलरीवर अवलंबुन असते. SBI Scheme: सेकंड हँड कारसाठी सहज मिळेल लोन! एका क्लिकवर जाणून घ्या व्याजदर, प्रोसेसिंग फिससह सर्व डिटेल्स जन धन अकाउंट प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत, जन धन खातेधारकाला रुपे डेबिट कार्ड आणि बचत बँक खाते दिले जाते. अशा वेळी, जन धन खातेधारकाला रुपे डेबिट कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा आणि अतिरिक्त 30,000 रुपये (अपघाती मृत्यू झाल्यास) दिला जातो. जन धन खातेधारकाला अशा विम्यासाठी कोणताही प्रीमियम भरण्याची गरज नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात