सध्याच्या काळात आपल्या मुलांसाठी फायनेंशियल प्लानिंग करणं खूप महत्त्वाचं असतं. सरकारकडून मुलींसाठी अनेक योजना चालवल्या जातात. ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही मुलींचं भविष्य सुरक्षित करु शकता.
सुकन्या समृद्धी योजना ही स्मॉल सेव्हिंग स्किम आहे. जन्मापासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी हे अकाउंट उघडता येतं. या योजनेत पालक मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात. हे अकाउंट किमान 250 रुपयांमध्ये उघडता येते. आर्थिक वर्षात तुम्ही यामध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. सध्या 8 टक्के व्याज दिले जात आहे. तुम्ही 21 वर्षांनंतर संपूर्ण रक्कम काढू शकता.
बालिया समृद्धी योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लोकांना त्याचा लाभ दिला जातो. ही योजना मणिपूर सरकार चालवते. या अंतर्गत 300 रुपये ते 1000 रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.
UDAN हा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अंतर्गत सुरू केलेली एक परियोजना आहे. शालेय शिक्षण आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांमधील अंतर कमी करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (MHRD) ही योजना सुरू केलीये. ज्यांनी 10वी मध्ये किमान 70% आणि विज्ञान आणि गणित विषयात 80% गुण मिळवले आहेत ते यासाठी अर्ज करु शकता. www.cbse.nic.in किंवा www.cbseacademic.in वर अर्ज करता येईल.
माध्यमिक शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय योजना केंद्र सरकारने 2008 मध्ये सुरू केली होती. या योजनेंतर्गत आठवी पास व नववीमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना लाभ दिला जातो. केंद्र सरकार मुलींच्या नावावर 3000 रुपये जमा करते आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यावर ही रक्कम व्याजासह त्यांना दिली जाते.
दिल्ली, महाराष्ट्र, बिहार, उत्तराखंड, राजस्थान आणि पश्चिम बंगालसारख्या अनेक राज्य सरकारे मुलींसाठी योजना चालवतात. या योजना जन्मापासून लग्नापर्यंतचा खर्च उचलतात.